
पाकिस्तानच्या लाहोरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे 12 वर्षाच्या मुलाने आईने मोबाईल फोन देण्यास नकार दिल्याने आत्महत्या केली.
सध्या लहान मुलांमध्ये मोबईलचं वाढतं व्यसना ही चितेंची बाब झाली आहे. मुलं सतात मोबाईलवर कार्टून आणि गेम्स खेळत असतात. पालकांनी मोबाईल फोन त्यांच्या हातून काढुन घेतला तर प्रसंगी मुलं चांगलाच आकांडतांडव करतात. असं चित्र बऱ्याच घरांमध्ये दिसतं. मात्र, या मोबाईलच्या हट्टापाई कुणी लहान मुलगा जीव देईल असा विचारही कुणी करु शकत नाही. पण असं घडलंय पाकिस्तानमध्ये. पाकिस्तानातील लाहोरमध्ये 12 वर्षाच्या मुलाने आईने मोबाईल फोन देण्यास नकार दिल्याने आत्महत्या (12 year Boy Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. क्षुल्लक गोष्टीसाठी मुलानं आत्महत्येचं पाऊल उचलल्याने आई-वडीलांना धक्का बसला आहे.
हे सुद्धा वाचा
राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लाहोरच्या रायविंड शहरात राहणाऱ्या १२ वर्षांचा मुलगा सतत मोबाईलमध्ये कार्टुन बघायचा आणि गेम्स खेळत राहायचं. त्याच्या या सवयीला कंटाळून त्याची आई त्याला रागवत होती तरीही त्याचं मोबाईलचं वेड काही कमी झालं नाही. घटनेच्या दिवशीही त्याने आईला मोबाईल फोन देण्याचा हट्ट धरला. त्याच्या आईने नकार दिला. वारंवार सांगितल्यावरही तो ऐकत नसलयाने आईने मुलाला फटकारले. दरम्यान, काही वेळाने त्याची आई काही कामासाठी बाहेर गेली. काही वेळाने ती घरी परतली तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. मुलाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. मुलाने घराच्या भिंतीतच खांबाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.









