
जळगाव जिल्ह्यातच शूटिंग
‘१ नंबरचा ढ’ या चित्रपटाची शूटिंग जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील खिर्डी, पाल, सावदा, फैजपूर आदी भागात करण्यात आली आहे. कमलेश सावंत, प्राची नील, लीना भुतकर, शर्व कुलकर्णी या कलाकारांनी ‘१ नंबरचा ढ’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत. मनीष याची भूमिका शर्व कुलकर्णी, महादेव अर्थात मनीषच्या वडिलांची भूमिका कमलेश सावंत, सुरेखा अर्थात आईची भूमिका प्राची नील यांनी, तर अजीची भूमिका विना भूतकर यांनी साकारली आहे. या चित्रपटात स्थानिक कलाकारांना देखील संधी देण्यात आली असून, यात किरण अडकमोल, हर्षल पाटील, विशाल जाधव, जगदीश नेवे, मोरेश्वर सोनार, आरती गोळीवाले, सपना बाविस्कर, नुपूर पांडे, अनिल कोष्टी तर बाल कलाकारांमध्ये दिग्विजय जगदाळ, पराग चौधरी, सिद्धार्थ पाटील, उत्कर्ष नेमाडे, कृष्णा चौधरी, अभिजित पाटील, आरुष रायसिंग आदींचा समावेश असल्याचे दिग्दर्शक प्रशांत सोनवणे यांनी सांगितले.








