
दिल्लीच्या भोगल भागात पार्किंगच्या किरकोळ वादाला हिंसक वळण लागलं आणि त्यात बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीचा चुलत भाऊ आसिफ कुरेशी याला आपला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर हत्येमागे जातीय कारण असल्याचे वृत्त समोर आले होते. दिल्ली पोलिसांनी मात्र शेजाऱ्यांमधील वैयक्तिक वादातून ही हत्या झाल्याचा दावा केला असून जातीय आरोप फेटाळून लावले आहेत.