हिवाळ्यात ‘या’ रंगाचे कपडे घालणे टाळा, नाहीतर…

0
39
हिवाळ्यात ‘या’ रंगाचे कपडे घालणे टाळा, नाहीतर…


Know which colour clothes are better for winter: हिवाळ्यात थंड हवेपासून संरक्षण करण्यासाठी, लोक विविध प्रकारचे उबदार कपडे वापरतात. ज्यामध्ये लोकरीचे स्वेटर, हूडी शॉल तसेच इतर हिवाळी स्टायलिश कपड्यांचा समावेश असतो. पण सर्वच प्रकारचे हिवाळी कपडे थंडीपासून पूर्णपणे संरक्षण देतात असे नाही. हे जाणून तुम्ही थक्क व्हाल, पण हिवाळ्यात काही रंगाचे कपडे शरीराला उब देतात तर काही रंगाचे कपडे तुम्हाला थंडीपासून वाचण्यास असमर्थ ठरतात. आणि थंड वातावरणापासून शरीराचे शंरक्षण न झाल्यास सर्दी-खोकल्यासारखे आजार उद्भवण्याची शक्यता अधिक वाढते. यापासून वाचण्यासाठी हिवाळ्यात नेमके कोणत्या रंगाचे कपडे घालणे टाळावे आणि कोणत्या रंगाते कपडे घालणे फायदेशीर ठरेल हे तुम्हाला माहीत असणे अत्यावश्यक आहे. 

 

 

 

हिवाळ्यात कोणत्या रंगाचे कपडे घालणे टाळले पाहिजेत?

 

बऱ्याचदा उन्हाळ्यात गडद रंगाचे कपडे घालणे टाळले जाते. कारण गडद रंगाचे कपडे अधिक उष्णचा शोषून घेतात. पण तुम्हाला माहित आहे का उन्हाळ्याप्रमाणे हिवाळ्यातही काही विशिष्ट रंगाचे कपडे घालणे टाळले पाहिजे. तज्ज्ञ सांगतात की, हिवाळ्यात फिकट रंगाचे कपडे घालणे टाळले पाहिजे. कारण उन्हाळ्यात उष्णतेपासून वाचण्यासाठी फिकट रंगाचे कपडे वापरले जातात, जेणेकरून जास्त प्रमाणात उष्णता शोषली जाणार नाही. पण हिवाळ्यात आपल्या शरीराला अधिक उष्णतेची आवश्यकता असते. ज्यामुळे शरीराला उब मिळेल आणि ऊर्जा टिकून राहील. फिकट रंगाचे कपडे उष्णता शोषून घेत नाहीत त्यामुळे पांढरे, पिवळे, किंवा कोणत्याही रंगाचे फिकट शेड्स असलेले कपडे घालणे टाळा.

 

 

 

हिवाळ्यात कोणत्या रंगाचे कपडे घालावेत?

 

गडद रंगाचे कपडे उष्णता शोषून घेतात, यामुळे हिवाळ्यात गडद आणि उबदार रंगाचे कपडे घालावेत. जसे की गडद निळे, मरून, गडद हिरवे, चारकोल ग्रे आणि तपकिरी रंग. हे रंग सूर्याची किरणे शोषून घेतात आणि शरीराला उबदार ठेवतात. डीप रेड, मस्टर्ड येलो, बेज, मरून आणि ऑलिव्ह ग्रीन यांसारखे रंग हिवाळ्यातील वातावरणाला पूरक ठरतात. 

 

 

 

हिवाळ्यात गडद रंगाचे कपडे कसे स्टाईल कराल?

 

गडद रंगाचे कपडे अनेकजणांना नापसंत असतात. कारण काहीवेळा गडद रंगामुळे आपला लुक सर्वांमध्ये वेगळा आणि भडक दिसतो. तसेच सध्या फिकट रंगाचे कपडे वापरण्याचा ट्रेंड आहे. पण तुम्ही योग्य फॅशन टिप्स फॉलो केल्या तर गडद रंगाचे कपडेही तुमच्या पर्सनॅलिटीला एक जबरदस्त लुक देऊ शकतात. 

 

 

फॅशन टिप्स:

 

1. काळ्या किंवा राखाडी रंगाच्या हिवाळी कपड्यांसोबत तेजस्वी रंगाचे स्कार्फ किंवा टोपी स्टाईल करू शकता. 

 

 

2. लोकरी, मखमली किंवा कॉरडरॉय सारख्या टेक्श्चरचे कपडे निवडा, जे स्टाईलसह उबदारपणाही देतात.

 

 

3. दिवसा बाहेर जायचे असल्यास गडद रंगांच्या कपड्यांचा वापर करा आणि संध्याकाळी चमकदार रंग वापरू शकता.





Source link