सावनीमुळे मोडला मिहिर आणि मिहिकाचा साखरपुडा, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत आजच्या भागात काय घडणार?

0
14
सावनीमुळे मोडला मिहिर आणि मिहिकाचा साखरपुडा, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत आजच्या भागात काय घडणार?


सावनीने व्यक्त केला संताप

मिहिरचा साखरपुडा हा मिहिकाशी कसा होतो तेच बघते असे बोलून सावनी कोळी कुटुंबाकडे गेलेली असते. ती भर साखरपुड्यात येऊन मी मिहिरची बहिण आहे आणि मला हा साखरपुडा मान्य नाही असे बोलते. मिहिर तिला तेथून हकलून देतो. मिहिरने तिला हकलून दिल्यामुळे सावनीला प्रचंड राग येतो. हे सगळे मुक्तामुळे होत आहे असे ती बोलताना दिसते. मी मुक्ताचा बदला घेईन असे देखील ती बोलते. आता आगामी भागात सावनी काय नवा डाव आखणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.



Source link