साताऱ्यात शेडवर नव्हे तर प्रकाश शिंदेंच्या रिसॉर्टवर रेड पडली; शंभूराज देसाईंना ‘ढ’ म्हणत सुषमा

0
30


Sushma Andhare on Satara Drug Case: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या साताऱ्यातील दरे गावापासून जवळच असलेल्या सावरी येथे मुंबई पोलीसांनी तब्बल 115 कोटींचा 45 किलो ड्रग्सचा साठा जप्त केला होता. पोलिसांनी ज्या हॉटेलवर धाड टाकली होती ते एकनाथ शिंदेंचे सख्खे भाऊ प्रकाश शिंदे (Prakash Shinde) यांच्या मालकीचे असून ते दरे गावचे सरपंच रणजीत शिंदे सांभाळतात, अशी माहिती समोर आली होती. मात्र, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या दबावामुळे या प्रकरणात कारवाई होत नसल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेकडून सातत्याने केला जात आहे. आता शिवसेना ठाकरे गटाच्या उप नेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणात मोठा गौप्यस्फोट केलाय. 

सुषमा अंधारे पत्रकार परिषदेत म्हणाल्या की, एक महिना होतं आला तरी सावरी जिल्हा सातारा येथे ड्रग्जच्या अनुषंगाने धाड पडली होती. मुलुंड वर्धा येथे धाड पडली आणि त्यानंतर मुलुंडच्या पोलिसांनी पुण्यातून विशाल मोरे याला अटक झाली होती. सावरी येथे जी रेड पडली, त्यामध्ये प्रकाश शिंदे जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाऊ आहे. ते म्हणाले आम्ही ती प्रॉपर्टी विकली आहे. ते खोटे बोलत आहेत. ज्यावेळी शाहरुख खानच्या मुलाला अटक झाली होती, त्यावेळी 13 ग्राम कोकेन होतं, 21 ग्राम चरस, 5 ग्राम एमडी ड्रग्ज मिळाल होतं. त्यानंतर प्रांजल खेवलकर यांच्या प्रकरणात पोलिसांनी धाड टारली आणि ड्रग्ज कसं-कसं सापडलं हे समोर आलं. त्या पत्रकार परिषदेत एक बाई देखील चमकोगिरी करायला पोहोचल्या होत्या. ज्या सावरीमध्ये 115 कोटी रुपये ड्रग्ज सापडलं, त्याठिकाणी ना सीसीटीव्ही समोर आले, ना पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली. रेड टाकणारे पीआय आत्मजित सावंत आहेत कुठे? त्यांच्या जिवाला काही धोका आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

Sushma Andhare on Satara Drug Case: शंभूराज देसाई पालकमंत्री म्हणून ‘ढ’ 

सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या की, प्रकाश शिंदे नेमके कोण आहेत? त्यांचा सबंध नाही असं म्हणत आहेत. तिथे बॅकवॉटरमध्ये कुणी बांधकाम केलं आहे. 1200 मीटर रस्ते त्याठिकाणी बांधण्यात आले, ते कोणी बांधले याबाबत पालकमंत्री शंभूराजे देसाई माहिती का देत नाही? प्रकाश शिंदे यांनी सर्वे नंबर 17 मधील कागदपत्रे दाखवले आणि ती आपली नाही म्हणाले. परंतु सदर प्रॉपर्टी ही सर्वे नंबर 13 मधील आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई पालकमंत्री म्हणून ‘ढ’ आहेत, असा हल्लाबोल त्यांनी शंभूराज देसाई यांच्यावर केला. 

Sushma Andhare on Satara Drug Case: स्पॉटवर असणारा ओंकार डिगे गायब कुठे झाला?

115 कोटी रुपयांचं ड्रग्ज सापडलं आहे. त्याठिकाणी स्पॉटवर असणारा ओंकार डिगे गायब कुठे झाला? त्या गावचा सरपंच जो युवा सेनेचा पदाधिकारी आहे तो कुठे आहे? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केले. तर  सगळ्यात मोठा गौप्यस्फोट म्हणजे ही रेड शेडवर नाही तर प्रकाश शिंदे यांच्या रिसॉर्टवर पडली आहे. देवेंद्र फडणवीस या प्रकरणी उत्तरे देणार आहेत की नाही? शेडवर रेड पडली नाही ते लोक रिसोर्टममध्ये राहत होते आणि तिथेच रेड पडली आहे, असा गौप्यस्फोट सुषमा अंधारे यांनी केलाय. 

Sushma Andhare on Satara Drug Case: ड्रग्जच्या धंद्याला शंभूराज देसाई यांचा पाठिंबा आहे का?

ओमकार डिगेला अटक कधी होणार आहे? ते अनधिकृत बांधकाम अजून पाडलं का नाही? पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी काय कारवाई केली आहे? ड्रग्जच्या धंद्याला शंभूराज देसाई यांचा पाठिंबा आहे का? राज्याच्या निवडणुकीत वारेमाप पैसा वाटला जात आहे तो कुठून आला आहे? सातारा पोलीस यांचा कारभार प्रचंड संशयास्पद आहे. प्रकाश शिंदे या प्रकरणात नाही, असं सातारा पोलीस म्हणत असतील तर आतापर्यंत त्यांनी कुणा-कुणावर कारवाई केली. पोलीस अद्याप माध्यमांच्या समोर आलेले नाहीत. किरीट सोमय्या यांचा हातोडा आता त्या सावरी येथील अनधिकृत रिसॉर्टवर कारवाई करणार आहात का? असा सवाल देखील सुषमा अंधारे यांनी उपस्थित केलाय. 

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Sanjay Raut on CR Patil: गुजरातचा नेता छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार असल्याचं म्हणाला, संजय राऊतांनी भाजपला धू-धू धुतलं, म्हणाले, तुमच्या गुजरातमध्ये सगळे बकासूर नेतेच जन्माला आले का?

आणखी वाचा



Source link