Sunday, August 16, 2026
Homeसातारासाताऱ्यातून लढणार नाही म्हणणारे श्रीनिवास पाटील कोणासाठी अडले; शशिकांत शिंदे काय म्हणाले?

साताऱ्यातून लढणार नाही म्हणणारे श्रीनिवास पाटील कोणासाठी अडले; शशिकांत शिंदे काय म्हणाले?

साताऱ्यातून लढणार नाही म्हणणारे श्रीनिवास पाटील कोणासाठी अडले; शशिकांत शिंदे काय म्हणाले?

[ad_1]

Satara Loksabha : बारामती लोकसभा (Baramati) मतदारसंघानंतर अतिशय प्रतिष्ठेचा केलेल्या सातारा (Satara) आणि माढा (Madha) लोकसभा मतदारसंघांमध्ये शरद पवार गटाची (Sharad Pawar) अजूनही काथ्याकूट सुरूच आहे. दोन्ही ठिकाणी अजूनही शरद पवार गटाला उमेदवार निश्चित केलेला नाही. त्यामुळे माढामध्ये रणजितसिंह निंबाळकर यांच्या विरोधात शरद पवार गटाचा उमेदवार कोण असणार आणि साताऱ्यामध्ये महायुतीचे संभाव्य उमेदवार उदयनराजे भोसले (Udyanraje Bhosale) यांच्या विरोधात कोण चेहरा असणार याची चर्चा अजूनही सुरूच आहे. गेल्या दोन दिवसांपासून शशिकांत शिंदे यांच्या नावावर शरद पवार गटांकडून शिक्कामोर्तब करण्यात आल्याची चर्चा रंगली होती. मात्र, निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नसलेल्या श्रीनिवास पाटील यांनी आपल्या मुलासाठी आग्रही मागणी केल्याने ही उमेदवारी कोणाच्या गळ्यात पडते? याकडे आता लक्ष आहे. 

दरम्यान, आज (4 एप्रिल) शशिकांत शिंदे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले की, सातारा लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने आज श्रीनिवास पाटील, सारंग पाटील आणि आमची शरद पवारांसोबत बैठक झाली असून कोणत्याही परिस्थितीत आपण निवडणूक लढणार असल्याची भूमिका श्रीनिवास पाटील यांनी मांडली आहे. ते पुढे म्हणाले की, शरद पवार संसदीय बोर्डाच्या माध्यमातून अंतिम निर्णय घेतला जाईल आणि तो आम्हाला मान्य असेल.

श्रीनिवास पाटील मुलाच्या उमेदवारीसाठी आग्रही

ते पुढे म्हणाले की, आजही स्थानिक परिस्थिती काय आहे याचा आढावा आमच्याकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे शरद पवार यांनी आदेश दिल्यास आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरून निवडणूक लढू असेही शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार सातारा लोकसभेसाठी शशिकांत शिंदे इच्छुक असतानाच सारंग पाटील यांच्यासह श्रीनिवास पाटील सिल्वर ओक निवासस्थानी पोहोचले. श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक न लढवण्याची भूमिका घेतली असली, तरी सारंग पाटील यांच्या उमेदवारीसाठी श्रीनिवास पाटील ठाम आहेत. 

शशिकांत शिंदे यांनी पक्षाने आदेश दिल्यास रणांगणात उतरून महायुतीच्या विरोधात जोरदार लढत देण्याची तयारी असल्याची भूमिका मांडली आहे. त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये काय निर्णय घेतला जाणार याकडे सातारावासियांचं लक्ष आहे. आज सातारचा उमेदवार जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. 

धैर्यशील मोहिते पाटील तुतारी हातात घेणार?

दुसरीकडे माढामधून धैर्यशील मोहिते पाटील तुतारी हातात घेतात का? याकडे सुद्धा लक्ष आहे. मोहिते पाटील आणि शरद पवार यांची भेट झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता तुतारी हाती  घेऊन रणजितसिंह निंबाळकर यांच्या विरोधात धैर्यशील मोहिते पाटील कडवं आव्हान निर्माण करणार का? याकडे सुद्धा राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments