साडेतीन वर्षांच्या मुलाच्या फुफ्फुसात LED बल्ब, डॉक्टरांच्या प्रयत्नांनी चिमुकला बचावला, पण बल्ब आत गेलाच कसा?

0
17
साडेतीन वर्षांच्या मुलाच्या फुफ्फुसात LED बल्ब, डॉक्टरांच्या प्रयत्नांनी चिमुकला बचावला, पण बल्ब आत गेलाच कसा?


Mumbai Shocking News: साडे तीन वर्षांच्या राहुलला (नाव बदलेले आहे) गेल्या तीन महिन्यांपासून खोकला आणि श्वसानाचा त्रास बोत होता. सुरुवातीला पालकांनी निदान केले. त्यामध्ये न्यूमोनिया आजार झाल्याच उघडकीस आलं. त्यानंतर त्याला अँटीबायोटिक्सचा औषधोपचार सुरु केला. तरीही त्रास काही कमी धाला नाही त्या लक्षणांनी राहुलला आणखी त्रास होऊ लागला. असं असताना त्याचा सीटी स्कॅन करण्यात आला. ज्यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली. 

Add Zee News as a Preferred Source

राहुलच्या डाव्या ब्रोन्कसमध्ये खोलवर धातूचा भाग असल्याचे आढळून आले. कोल्हापूरात फ्लेक्सिबल ब्रॉन्कोस्कोपीच्या अयशस्वी प्रयत्‍नांनंतर मुलाला जसलोक हॉस्पिटलमध्‍ये आणण्‍यात आले. जेथे ब्रॉन्कोस्कोपीमध्ये गिळण्‍यात आलेला एलईडी बल्‍ब ब्रोन्कसमध्ये आढळून आला. त्यानंतर डॉ. विमेश राजपूत आणि डॉ. दिव्य प्रभात यांनी मिनी थोरॅकोटॉमी (४ सेमी कट) केली, ज्यामुळे खेळण्यांच्या गाडीतून गिळलेला एलईडी बल्ब यशस्वीरित्या काढून टाकण्यात आला आणि मुलाच्या फुफ्फुसांचे कार्य पूर्ववत करण्यात आले. अॅनेस्थेसियोलॉजी सल्लागार डॉ. अनुराग जैन यांनी या शस्त्रक्रियेला मोठे सहकार्य केले.

या केसबाबत मत व्‍यक्‍त करत जसलोक हॉस्पिटलमधील थोरॅसिस सर्जन डॉ. विमेश राजपूत म्‍हणाले, “आम्‍ही ऑपरेट केलेली ही सर्वात दुर्मिळ केस होती. एलईडी बल्ब फुफ्फुसामध्‍ये खोलवर गेला होता आणि समकालीन उपचार पद्धती तो बल्‍ब बाहेर काढण्‍यामध्‍ये अयशस्‍वी ठरल्‍या. काळजीपूर्वक नियोजन केलेल्या मिनी थोरॅकोटॉमीसह आम्‍ही सुरक्षितपणे एलईडी बल्‍ब बाहेर काढला आणि मुलाला जीवनदान मिळाले.” 

(हे पण वाचा – चॉकलेट ठरलं मृत्यूचं कारण, गळ्यात अडकला तुकडा; आई-बापासमोर 7 महिन्यांच्या मुलीने गमावला जीव)

ईएनटी सर्जन डॉ. दिव्य प्रभात म्‍हणाल्‍या, “मुलांमध्ये अस्पष्ट आणि सतत दिसणाऱ्या श्‍वसनसंबंधित लक्षणाकडे कधीही दुर्लक्ष करू नये. यामुळे अनेकदा न्यूमोनिया किंवा इतर सामान्य आजारांमुळे अशा केसचे निदान होण्यास विलंब होतो. प्रगत इमेजिंगद्वारे लवकर निदान केल्यास परिणामांमध्ये लक्षणीय सुधारणा होऊ शकते आणि गुंतागूंत टाळता येऊ शकते.”

चीफ मेडिकल ऑफिसर डॉ. मिलिंद खडके म्‍हणाले, “मुलांनी एखादी वस्‍तू गिळणे हे पालकांच्‍या लक्षात न येणे स्‍वाभाविक आहे. वेळेवर वैद्यकीय लक्ष आणि स्‍पेशलिस्‍ट हस्‍तक्षेप फुफ्फुसाचे दीर्घकालीन नुकसान होण्‍याला प्रतिबंध करण्‍यासाठी महत्त्वाचे आहे. ही केस पालकांना व आरोग्‍यसेवा प्रदात्‍यांना मुलांमध्‍ये गंभीर, अनिश्चित श्‍वसनसंबंधित समस्‍या आढळून आल्‍यास दक्ष राहण्‍याची आठवण करून देते.” 

आभार व्यक्‍त करत, मुलाचे वडील अविनाश पाटील म्हणाले, ”आम्हाला किती दिलासा मिळाला आहे ते शब्दात सांगता येऊ शकत नाही. तीन महिने आम्ही सतत भीतीच्‍या वातावरणात जगत होतो, आमच्या मुलाला काय झाले आहे हे आम्हाला कळत नव्हते. जसलोक हॉस्पिटलमधील अविश्वसनीय टीमचे आभार, राहुल आता मोकळा श्‍वास घेत आहे आणि पुन्हा हसत आहे. या हॉस्पिटलने आमच्या मुलाला नवीन जीवन दिले आहे आणि आम्ही नेहमी त्‍यांचे आभारी राहू.” या प्रकरणातून पुन्हा एकदा लहान मुलांची विशेष काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे, हे अधोरेखित झाले आहे. 

FAQ

मुलांनी वस्तू गिळली आहे हे कसे ओळखावे?
मुलाने एखादी वस्तू गिळली असल्याचे लक्षणांमधून समजते, जसे की खोकला, श्वास घेण्यात अडचण, गळ्यात दुखणे, जास्त थुंथणे, रक्त येणे किंवा पोटदुखी. काही मुलांमध्ये लक्षणे दिसतच नाहीत, म्हणून संशय असल्यास ताबडतोब डॉक्टरांना भेटा. ३ वर्षांखालील मुलांमध्ये हे सामान्य असते, कारण ते वस्तू तोंडात घालून तपासतात.

श्वसन समस्या कधी धोकादायक ठरते?
जर वस्तू श्वासनलिकेत (एअरवे) अडकली असेल, तर खोकला, श्वास रोखणे किंवा श्वास घेण्यात तीव्र अडचण होऊ शकते. हे फुफ्फुसांमध्ये (जसे की ब्रॉन्कसमध्ये) अडकल्यास न्यूमोनियासारखे आजार होतात. असा त्रास असल्यास तात्काळ हॉस्पिटलात न्या; विलंबाने जीवाला धोका होऊ शकतो.

निदान कसे होते?
सीटी स्कॅन, एक्स-रे किंवा ब्रॉन्कोस्कोपीद्वारे वस्तूची जागा शोधली जाते. एक्स-रे मध्ये प्लास्टिक किंवा लाकडी वस्तू दिसत नाहीत, म्हणून डॉक्टरांना लक्षणे आणि संशयित वस्तूची माहिती द्या. प्रगत इमेजिंगमुळे लवकर निदान शक्य होते.





Source link