
‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत अद्वैत आणि कलाची कथा दाखवण्यात आली आहे. अद्वैत हा चांदेकर कुटुंबातील श्रीमंत मुलगा आहे. तर कला ही अतिशय गरीब घरातून आली आहे. त्या दोघांचे नियतीने लग्न लावून दिले. पण त्यांची तू तू मैं मैं न थांबणारी आहे. कलाची बहिण नैना आणि अद्वैतचा भाऊ राहुल यांचा साखरपुडा होणार आहे. पण दोघेही या सारखपुड्यासाठी प्रयत्न करत आहे. पण राहुलला हा साखरपुडा करायचा नसल्यामुळे तो मोडता कसा येईल याकडे त्याचे आणि रोहिणीचे लक्ष आहे.







