Wednesday, August 19, 2026
Homeमहाराष्ट्रसरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज कॅप्टन हंबीरराव अमृतराव मोहिते यांचे निधन

सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज कॅप्टन हंबीरराव अमृतराव मोहिते यांचे निधन

सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज कॅप्टन हंबीरराव अमृतराव मोहिते यांचे निधन

[ad_1]

कॅप्टन हंबीरराव मोहिते हे तळबीड (ता. कराड) येथील सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे तृतीय चिरंजीव रतोजी राजे, यांचे थेट वंशज होते. त्यांच्या घरातील ७ पिढ्यांनी भारतीय लष्करी सेवेत योगदान दिले आहे. दोन्ही महायुद्धांमध्ये बाजी-मोहिते सैनिक आणि अधिकाऱ्यांनी यांनी मोठा पराक्रम गाजवून भारतीय लष्करामध्ये आपले नाव अजरामर करून ठेवले आहे. कॅप्टन हंबीरराव स्वतः मराठा लाईट इन्फंट्री तर्फे वयाच्या २० व्या वर्षी दुसऱ्या महायुद्धामध्ये प्रत्यक्ष सहभागी झाले होते. त्यांनी इटली येथील युद्धात हिटलरच्या नाझी सैन्याविरुद्ध ‘प्लॅटून टॅंक कमांडर’ म्हणून मोठी कामगिरी बजावली होती. महायुद्धानंतर त्यांची नेमणूक मित्र देशांच्या जपान येथील मुख्यालयात करण्यात आली, तेव्हा त्यांचा जपानी संस्कृती आणि सभ्यतेशी जवळचा संबंध आला, ज्याचा त्यांना आयुष्यभर उपयोग झाला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments