सरकार ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन घडवणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन’ योजनेची घोषणा

0
20
सरकार ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन घडवणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून  ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन’ योजनेची घोषणा


ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन –

शिवसेनाआमदार प्रताप सरनाईक यांनी लक्षवेधी सूचना मांडत ही मागणी केली होती. यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही योजना लागू करत असल्याचे सांगत म्हणाले की, आमचे सरकार सर्वसामान्यांचे असून अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये शेतकरी, कष्टकरी, वारकरी, कामगार, महिला, युवा यांच्यासाठी विविध तरतुदी केल्या आहेत, आपला महाराष्ट्र संतांची भूमी असून दरवर्षी अनेक जण तीर्थस्थळांना भेटी देतात. ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन सुलभपणे होण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली जाणार आहे.त्यासाठी धोरण तयार करून त्याची नियमावली बनवली जाईल. त्याअंतर्गत आवर्तन पद्धतीने, ऑनलाईन अर्ज मागवून ही योजना राबविण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.



Source link