संध्याकाळची मालिका दुपारी बघितली जाईल का? ‘आई कुठे काय करते’च्या बदललेल्या वेळेवर ‘अनिरुद्ध’ म्हणतो…

0
39
संध्याकाळची मालिका दुपारी बघितली जाईल का? ‘आई कुठे काय करते’च्या बदललेल्या वेळेवर ‘अनिरुद्ध’ म्हणतो…


इतक्या लवकर कशी संपेल ही गोष्ट?

‘मला खरंच स्टार प्रवाहचं,राजन शाहींचं, नमिताचं, सतीश राजवाडे यांचं, दिग्दर्शकांच्या टीम्सचं, क्रियेटिव्ह टीमचं माझ्या सहकलाकारांचं पूर्ण युनिटचं कौतुक करावसं वाटतं, उत्तम काम करायचीकान्सिस्टन्सी, क्रियेटिव्ह माइंड…बऱ्याच लोकांना असं वाटलं होतं की ही मालिका खूप चालली आहे, आता अजून पुढे हे काय दाखवणार आहेत?पण या मालिकेचा कलाकार म्हणून प्रत्येक वेळेला माझ्या हातात जेव्हा स्क्रिप्ट येते, स्क्रीन प्ले येतो, माझी स्वतःची काम करायची उत्सुकता वाढत जाते.आणि माणसांच्या आयुष्यावर आधारलेली गोष्ट, ही इतक्या लवकर कशी संपू शकेल, जसं आपल्या सगळ्यांचे आयुष्यामध्ये सतत काही ना काहीतरी घडत असतं, तसंच या देशमुख कुटुंबामध्ये आपली उत्कंठा आणि उत्सुकता वाढवणारा घडत असतं.आजही मला करताना तेवढीच मजा येते आहे’, असं मिलिंद गवळी म्हणाले.



Source link