शेखर गुप्ता यांचा कॉलम: चीनला ऊर्जासंकटाचा सामना का करावा लागला नाही?‎

0
1
शेखर गुप्ता यांचा कॉलम:  चीनला ऊर्जासंकटाचा सामना का करावा लागला नाही?‎




‎‎‎‎‎‎‎‎एलपीजी आणि नैसर्गिक वायूंची कमतरता भारतात‎घरांपासून ते मध्यम तसेच लघुउद्योगांपर्यंत आणि खत‎उत्पादनापर्यंत ज्या प्रकारे त्रासदायक ठरत आहे, त्याचा‎आढावा घेताना मला उत्सुकता वाटली की चीन इतका‎शांत का आहे. त्याचे फलित असे निघाले की त्यांनी‎शहाणपण दाखवले. चीनकडेही आपल्याप्रमाणे तेल आणि‎वायूचा मोठा साठा नाही. तोदेखील यांची मोठी आयात‎करतो. परंतु तो आपल्यासारखा चिंतेत नाही. कसे?‎ चीनला मोठ्या प्रमाणात कच्चे तेल व वायू रशियाकडून‎पाइपलाइनद्वारे मिळतो. परंतु हे त्यांच्यासाठी पुरेसे आहे?‎येथे आपण खताबाबत काळजीत आहोत, कारण खरीप‎पेरणी सुरू होणार आहे. परंतु चीन निर्धास्त आहे. केवळ‎स्वतःच्या गरजांसाठीच नव्हे, तर निर्यातीच्या आपल्या‎करारांबाबतही. आपण खतासाठी चीनकडून होणाऱ्या‎आयातीवरही अवलंबून आहोत. जेव्हा पूर्व लडाख आणि‎गलवानमध्ये संकटाची स्थिती निर्माण झाली होती, तेव्हा‎आपल्याला खतटंचाईचा सामना करावा लागला होता. परंतु‎चीनने अनपेक्षित परिस्थितीचे कारण देऊन खतांच्या‎आपल्या निर्यातीला नकार दिलेला नाही. या वास्तवाने मला‎धक्का बसला. हा धक्का चीनच्या यशाबद्दलही होता आणि‎आपल्या कामचलाऊ वृत्तीबद्दलही होता.‎ चीनकडे वायूचे साठे कमीच आहेत, परंतु वायू पुरेसा‎आहे. याचे कारण असे की चीनने कोळशापासून वायू‎बनवण्यामध्ये भांडवल, कौशल्य आणि तंत्रज्ञानाचा‎संयमाने वापर केला. या कल्पनेवर भारत आणि चीनने‎एकाच वेळी विचार सुरू केला होता, परंतु आज चीन‎दरवर्षी 80 दशलक्ष मेट्रिक टन (एमएमटीपीए) वायूचे‎उत्पादन करत आहे. आपण त्याचे मात्र 3 ते 5 टक्केच करत‎आहोत. चीन वायू उत्पादनासाठी 340 (एमएमटीपीए)‎कोळशाचा वापर करत आहे, तर भारत फक्त 1.4 टक्के‎कोळसा वापरत आहे. यूपीए सरकारने 2007 मध्ये ‎‎कोळशापासून मिथेन वायू बनवण्याच्या मोठ्या गप्पा‎मारल्या होत्या. राणीगंजमध्ये एक छोटा प्रायोगिक प्रकल्पही ‎‎उभा केला होता. त्यानंतर या कल्पनेचा विसर पडला.‎तसेही, त्या सरकारच्या काळात कोळसा खूप बदनाम झाला ‎‎होता. कोविडनंतर सुधारणांचा जो ओघ सुरू झाला,‎त्यामध्ये 2020 मध्ये मोदी सरकारने राष्ट्रीय कोळसा‎वायूकरण मोहिमेचा शुभारंभ केला. त्या योजनेअंतर्गत 2030 ‎‎पर्यंत 100 एमएमटीपीए कोळशाच्या वापरापासून वायू ‎‎उत्पादनाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. या योजनेत ‎‎चार लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार होती. 100 ‎‎एमएमटीपीएवर आपले कोळसा वायू (ज्याला सिंथेटिक ‎‎सिनगॅसदेखील म्हटले जाते) उत्पादन चीनच्या‎उत्पादनापेक्षा 25 टक्क्यांनी जास्त झाले असते.‎ आज आपण या दहा वर्षांच्या योजनेच्या सहाव्या वर्षात ‎‎आहोत आणि एकूण उत्पादन केवळ 5 एमएमटीपीएच आहे ‎‎(चांगल्या उत्पादनाच्या वर्षात). यापैकी 1.8 एमएमटीपीए ‎‎उत्पादन ओडिशामधील अंगुल येथील एका खासगी‎पोलाद प्रकल्पात होते, ज्यात नवीन आधुनिक प्रक्रियेचा‎वापर केला जात आहे आणि हे बहुतेक अंतर्गत वापरासाठी ‎‎आहे. याव्यतिरिक्त, कोळसा मंत्रालय आणि नीती ‎‎आयोगाची संकेतस्थळे सांगतात की कोळशापासून वायू ‎‎उत्पादनाच्या सात प्रकल्पांसाठी 64,000 कोटींच्या‎गुंतवणुकीला मंजुरी दिली गेली आहे. साधारणपणे हे सर्व‎प्रकल्प सार्वजनिक क्षेत्रातील कोल इंडिया लिमिटेडसोबत‎संयुक्त उपक्रम म्हणून लागू होतील, परंतु सध्या हे‎नियमांच्या चक्रात अडकले आहेत. मी झारखंडच्या‎जामतारा येथील कस्टामधील कोल इंडियाच्या‎उपकंपनीच्या भूगर्भीय कोळसा वायूकरण प्रकल्पाबद्दल‎वाचले. येथे आतापर्यंत उत्पादन सुरू व्हायला हवे होते. परंतु‎हे कोळसा आणि पर्यावरण मंत्रालयांच्या वादात अडकले‎आहे. पर्यावरण मंत्रालय जोर देत आहे की प्रकल्प‎जमिनीच्या 300 मीटर खाली असायला हवा. कोळसा‎मंत्रालय 150-160 मीटर खाली लावू इच्छित आहे. निकाल‎तीच जुनी कथा. आपण कोळसा काढणेदेखील फक्त‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎उघड्या खाणींपर्यंत मर्यादित ठेवले आहे. आपला संपूर्ण‎भूगर्भीय कोळसा असाच पडून आहे, तर चीन जमिनीच्या‎आत तीन किमीपर्यंत जाऊन कोळसा काढत आहे.‎ कोळसा मंत्रालयाच्या संकेतस्थळावर दोन चांगल्या‎गोष्टी वाचायला मिळाल्या, ज्या दोन मोठ्या खासगी‎कंपन्यांच्या गटांकडून टाकल्या गेल्या होत्या. त्या आठवण‎करून देतात की भारताकडे जगातील कोळशाचा पाचवा‎सर्वात मोठा साठा आहे. त्या तांत्रिक प्रक्रिया स्पष्ट करतात‎आणि सांगतात की काय सुधारणा केल्या जाऊ शकतात‎आणि कोणती संसाधने हवी आहेत. त्या आजकाल‎प्रचलित असलेल्या ‘ऊर्जा आत्मनिर्भरते’सह इतर लाभही‎मोजून दाखवतात.‎ दूरदृष्टीच्या बाबतीत आपण चीनच्या मागे नाही. परंतु‎चीनच्या उलट आपण बोलण्याचे कृतीत रूपांतर‎करण्यामध्ये मागे पडतो. ही केवळ आपलीच प्रवृत्ती नाही.‎जगातील कोळशाचा सातवा सर्वात मोठा आणि उच्च‎स्तरावरील साठा असलेला इंडोनेशियादेखील यात मागे‎राहिला आहे. तोदेखील आता कोळशापासून वायू‎बनवण्याच्या दिशेने पाऊल टाकत आहे.‎ चीनने खूप आधीच समजून घेतले होते की तेलाच्या‎बाबतीत धक्के बसत राहतील. अमेरिका आपल्या‎फायद्यासाठी निर्बंधांचा वापर करत राहील. म्हणूनच त्याने‎त्या गोष्टीमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला, जी‎त्याच्या ताब्यात आहे आणि त्याने बाजारपेठेतील‎चढ-उतारांची पर्वा न करता त्या मार्गावर चालणे सुरू‎ठेवले. हायड्रोकार्बनच्या किमतीत घट असतानाही त्याने‎आपला रस्ता सोडला नाही. कोळशाला राष्ट्रीय धोरणात्मक‎ध्येय बनवणे त्याला ऊर्जेच्या बाबतीत स्वातंत्र्य मिळवण्याचा‎मंत्र वाटला आणि त्याने ते करून दाखवले. आपण मात्र‎त्रुटी काढण्यातच अडकलो आहोत. आपल्याकडे‎पिकांसाठी डीएपी खत अत्यंत आवश्यक आहे. भारत‎याचा बहुतांश भाग आयात करतो. याची इतकी कमतरता‎आहे की हताश शेतकरी यासाठी दंगल आणि लूटमार करू‎नयेत, हे टाळण्यासाठी अनेक राज्यांनी याचा साठा पोलिस‎ठाण्यांत जमा करण्यास सुरुवात केली आहे. हे‎शेतकऱ्यांच्या जमिनीचे रेकॉर्ड आणि आधार कार्डावर‎आधारित नोंदणीनुसार वाटप केले जाते. चीन पूर्ण जगाच्या‎गरजेच्या युरियाचा 40 टक्के हिस्सा कोळशापासून‎मिळणाऱ्या कृत्रिम वायूद्वारे उत्पादित करतो. याव्यतिरिक्त‎तो पूर्ण जगाच्या गरजेच्या मिथेनॉलचा 54 टक्के हिस्सा‎उत्पादित करतो, ज्याचा सुमारे 70 टक्के भाग कोळशापासून‎मिळवला जातो. या सगळ्यात आपण कोळसा कुठे उभे‎आहोत? (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)‎ त्या गोष्टींत गुंतवणूक केली,‎जी चीनकडे मुबलक होती…‎चीनला खूप आधीच हे समजले होते की तेलाच्या‎बाबतीत धक्के बसत राहतील. अमेरिका आपल्या‎फायद्यासाठी निर्बंधांचा वापर करत राहील.‎म्हणूनच त्यांनी त्या गोष्टीत गुंतवणूक करण्याचा‎निर्णय घेतला, जी त्याच्या स्वतःच्या ताब्यात आहे‎आणि बाजारपेठेतील चढ-उतारांची अजिबात‎पर्वा केली नाही.‎



Source link