Thursday, August 20, 2026
Homeमहाराष्ट्रशिंदे-फडणवीस सरकारमधील पहिली महिला मंत्री, अदिती तटकरेंनी शपथ घेतली

शिंदे-फडणवीस सरकारमधील पहिली महिला मंत्री, अदिती तटकरेंनी शपथ घेतली

शिंदे-फडणवीस सरकारमधील पहिली महिला मंत्री, अदिती तटकरेंनी शपथ घेतली

[ad_1]

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) मोठी घडामोड घडली. अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार राज्याचे नवे उपमुख्यमंत्री बनले तर अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांच्या रुपाने शिंदे-फडणवीस सरकारला पहिली महिला मंत्री मिळाली. यापूर्वी शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात (Shinde Fadnavis Cabinet) एकही महिला मंत्री नसल्याने टीका केली जात होती. आता राष्ट्रवादी सोबत आल्याने अदिती तटकरे यांना शिंदे फडणवीस सरकारमधील पहिली महिला मंत्री बनण्याचा मान मिळाला आहे.

कोणी शपथ घेतली?

अजित पवार – उपमुख्यमंत्री
छगन भुजबळ – मंत्री
हसन मुश्रीफ – मंत्री
दिलीप वळसे पाटील – मंत्री 
धनंजय मुंडे – मंत्री 
अदिती तटकरे – मंत्री
अनिल भाईदास पाटील  – मंत्री
बाबुराव अत्राम – मंत्री
संजय बनसोडे – मंत्री

अजित पवारांचा धक्का

अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचा एक गट शिंदे-फडणवीस सरकारसोबत सामील झाला आहे. राष्ट्रवादीचे 40 आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चन्द्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. मात्र राष्ट्रवादीचे फक्त आमदारच नव्हे तर 2 खासदार देखील अजित पवारांच्यासोबत गेले आहेत. सध्या राजभवनात खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare)  आणि अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे दोन्ही खासदार उपस्थित आहे. त्यामुळे शरद पवार यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments