
One Nation One Election : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार चालू संसदेच्या अधिवेशनातच ‘वन नेशन, वन इलेक्शन’ विधेयक मांडू शकते. अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने असे सांगण्यात आले आहे की, सरकार हिवाळी अधिवेशनात हे विधेयक मांडण्याच्या तयारीत आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद समितीच्या ‘वन नेशन, वन इलेक्शन’ या अहवालाला केंद्रीय मंत्रिमंडळाने यापूर्वीच मंजुरी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारला या विधेयकावर एकमत होऊन ते संयुक्त संसदीय समितीकडे (जेपीसी) सविस्तर चर्चेसाठी पाठवायचे आहे.







