
अमरेश कुशवाह यांनी नीता अंबानी यांनी खरेदी केलेल्या साडीविषयी माहिती दिली आहे. नीता अंबानी यांच्या टीममधील लोकांनी माझ्याशी संपर्क साधला. त्यानंतर मी जवळपास ६० साड्या घेऊन त्या राहात असलेल्या हॉटेलमध्ये गेलो. त्यांनी रात्री स्वत: या सगळ्या साड्या पाहिल्या. सोनं-चांदीची कारागिरी असलेली, लाल रंगाची बुटी साडी त्यांना जास्त आवडली. माझ्याकडील अजून काही साड्या देखील त्यांनी खरेदी केल्या होत्या. नीता अंबानी यांना आवडलेली साडी बनवण्यासाठी जवळपास ५० ते ६० दिवस लागले होते. त्यांच्या या साडीची किंमत १ लाख ८० हजार रुपये आहे असे अमरेश कुशवाह म्हणाले.
वाचा: ‘संसदेत गदारोळ झाला होता’, शर्मिला टागोर यांच्या बिकिनी फोटोशूटवर पतीची काय होती प्रतिक्रिया?







