“राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका, बाळासाहेब असते तर..”; सदा सरवणकरांचं मोठं विधान

0
14
“राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका, बाळासाहेब असते तर..”; सदा सरवणकरांचं मोठं विधान


राजसाहेब माझ्या सारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका, मला समर्थन द्या, अशा शब्दात विद्यमान आमदार सदा सरवणकर यांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माहीमचे उमेदवार सदा सरवणकर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.सदा सरवणकर यांनी बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दाखला देत राज ठाकरेंना हे आवाहन केलं आहे. बाळासाहेबांनी देखील नातेवाईकांना सीट सोडायला सांगितलं नसतं असं देखील त्यांनी म्हंटलं आहे. मला समर्थन द्या अशीही विनंती सरवणकर यांनी राज ठाकरे यांना केली आहे.



Source link