
- Marathi News
- Opinion
- Rashmi Bansal’s Column Travel On The Cycle Of Your Dreams, You Will Truly Achieve Success
3 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
सीबीएसई बारावीचे निकाल लागले आहेत. ‘पुढे कायकरायचं बेटा?’ असं सगळे विचारत आहेत. काही मुलांना आयआयटी वगैरेमध्ये प्रवेश मिळेल, पण बाकीचे कुठे जातील? ते अशा कॉलेजमध्ये जातील, जिथे काही विशेषअभ्यास होत नाही. जिथल्या पदवीला काही किंमत नाही.
तसे पाहता, एआयच्या काळात आता काही सांगता येत नाही. कोणत्याही पदवीचे आयुष्यभर मूल्य राहील असे वाटत नाही. नुकतेच आयआयएम अहमदाबादच्या एका विद्यार्थ्याने चॅट-जीपीटीने आपल्या असाइनमेंट केल्या आणि त्याला ‘ए’ ग्रेड मिळाला. नंतर त्याने या गोष्टीचाखुलासा केला की, ‘मी फक्त हे पाहू इच्छित होतो की,निकाल काय लागतो?’
तसे ‘कॉपी’ करणे तर खूप पूर्वीपासून होत आले आहे.आधी लोक चिठ्ठ्या पास करायचे, आता ते तंत्रज्ञानाचा वापर करतात. कॉपी करणाऱ्याला खूप आनंद होतो की ‘बघा मी परीक्षकाला कसा मूर्ख बनवला?’ पण हेकरत-करत तुम्ही स्वतः मूर्ख बनला नाहीत का?
आळस हा माणसाचा शत्रू आहे. पण हेही खरे आहे की, कॉलेजचा अभ्यासक्रम खूप कंटाळवाणा आणि जुना आहे. जग वेगाने पुढे जात आहे, पण त्याच जुन्या गोष्टी शिकवल्या जात आहेत. विद्यार्थी विचार करतो- ‘हे शिकून मला कायफायदा?’ विद्यापीठाकडे याचे कोणतेही उत्तर नाही.
सामान्य माणसाला खात्री हवी असते की ‘अमुक-तमुक करून आयुष्य ‘सेट’ होईल.’ शाळा-कॉलेजमध्ये हे शक्य आहे. पण, आयुष्याची परीक्षा इतकी सोपी नसते. त्यात तर बहुतांश प्रश्न ‘अभ्यासक्रमाबाहेरचे’ च (आउट ऑफसिलॅबस) येतात. कारण उद्या काय होईल, हे कोणालाच माहिती नाही.
असे म्हटले जात आहे की, एआयमुळे २-४ वर्षांत अनेक नोकऱ्या गायब होतील. प्रोग्रामर असो वा कन्सल्टंट, जे कामते करत होते, ते आता मशीन करेल. इतकेच काय,ड्रायव्हरलेस गाड्याही आता येत आहेत. त्या हजारो-लाखोलोकांचे काय होईल, ज्यांची रोजीरोटी जाईल?
आर्थिक तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, एक दिवस मशीन आपल्यासाठी काम करतील आणि आपण आराम करू. सरकार प्रत्येकाला ‘निश्चित रक्कम’ देईल, त्यामुळे तुम्हाला काम करण्याची गरज नाही. आज वेळ खूप मौल्यवान आहे, कळत नाही तो कुठे गेला? पण तुमच्याकडे खूप वेळ असता तर तुम्ही काय केले असते? उफ्फ, हे काल्पनिक विचार आहेत. जे शक्य नाही, त्याची स्वप्ने कापाहावी? हीच तर समस्या आहे. तुम्ही वर्तमान काळाच्या दलदलीत असे फसला आहात की याहून चांगले जग तुम्ही मनातही तयार करू शकत नाही. स्वप्न पाहणे हा तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे, हक्काने पाहा.
जगात जेवढी प्रगती झाली आहे, ते कधी तरी एक स्वप्न होते, कोणाच्या तरी डोक्यात. स्वतंत्र होण्याचे स्वप्न, श्रीमंतहोण्याचे स्वप्न, काही तरी करून दाखवण्याचे स्वप्न. स्वप्नाचा आकार-प्रकार नसला तरी त्यात अपार शक्तीआहे. लोक रस्त्यावर चालत आहेत, स्वप्न पाहणाऱ्याकडे सायकल आहे. ती सायकल चालवण्यासाठी जोर लागेल, घाम येईल, थकवा येईल. पण, स्वप्न मनाच्या पडद्यावर येऊन पुन्हा जोश देईल. टायर पंक्चर होईल, अपघातहीहोऊ शकतो. जेव्हा असे वाटेल की, पुढे जाणे अशक्यआहे, तेव्हा कोणी तरी अनोळखी व्यक्ती येऊन मदत करेल. गुगलवर सर्च करा- “द हीरोज जर्नी”, त्यात १२ टप्पे येतात. महाभारतातील पात्र असो किंवा आजचा जिवंत माणूस, हा फॉर्म्युला स्वप्न पाहणाऱ्यावर लागू होतो – जो कोणी मोठे आव्हान स्वीकारतो, जो आपल्या नशिबाला आव्हान देतो.
तर तुमचे कमी मार्क आले, ‘चांगल्या कॉलेज’मध्ये प्रवेश मिळाला नाही, हरकत नाही. तुम्ही स्वप्न बघा की, मी एकलव्यासारखा अर्जुना इतका हुशार बनेन. आज इंटरनेट द्रोणाचार्यापेक्षा कमी नाही. शिकण्याची इच्छा ज्याला असेल, त्याला जगाचे समस्त ज्ञान मिळू शकते.
हो, जग बदलेल, त्याला कोणीही रोखू शकत नाही, पण विजय त्याचाच होईल, जो वेळेनुसार बदलण्यास तयार आहे. जो ‘आउट ऑफ सिलॅबस’ परीक्षेला घाबरत नाही,जो आपल्याच मार्गावर चालतो. ज्याने आपल्या आतआत्मविश्वास जागृत केला, त्याला पदवीपेक्षा काही तरी अधिक मिळाले. स्वप्नांच्या सायकलवर प्रवास करा, तुम्हाला खरोखर यश मिळेल.
(ही लेखिकेची वैयक्तिक मते आहेत.)