Thursday, August 27, 2026
Homeक्रीडायशस्वी जैस्वाल याने जिंकला ‘आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ अ‍ॅवॉर्ड’ | पुढारी

यशस्वी जैस्वाल याने जिंकला ‘आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ अ‍ॅवॉर्ड’ | पुढारी

यशस्वी जैस्वाल याने जिंकला ‘आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ अ‍ॅवॉर्ड’ | पुढारी

[ad_1]








दुबई, वृत्तसंस्था : टीम इंडियाचा स्फोटक सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वाल याने फेब्रुवारी महिन्याच्या ‘आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कारावर मोहोर उमटवली आहे. त्याने या पुरस्काराच्या शर्यतीत श्रीलंका संघाचा पथुम निसांका आणि न्यूझीलंड संघाचा केन विल्यमसन यांना मागे टाकले आहे.

हा पुरस्कार जिंकणारा यशस्वी जैस्वाल सातवा भारतीय पुरुष क्रिकेटपटू आहे. यशस्वीने 2023 साली वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला. त्याने आतापर्यंत 9 कसोटी सामन्यांच्या 16 डावांमध्ये 68.53 च्या उत्कृष्ट सरासरीने 1,028 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 3 शतके आणि 4 अर्धशतके झळकली आहेत. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 214 धावा आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये या खेळाडूने 24 सामन्यांच्या 42 डावांमध्ये 75.60 च्या सरासरीने 2,873 धावा केल्या आहेत.









[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments