
Sprouts or boiled Which chana are better: हरभरा, चणा आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. थंडीमध्ये तर हे कडधान्य आवर्जून खायला हवं. चण्यात त्यात तुमच्या शरीराला आवश्यक असलेले सर्व पोषक घटक असतात. चण्यामध्ये लोह, प्रथिने, कॅल्शियम, फायबर आणि असे बरेच पोषक तत्त्व असतात .असे म्हटले जाते की जरी तुम्ही मांसाहारी पदार्थ खाल्ले नाहीत तरी चणे खाल्ल्याने तुमचे प्रथिनांचे प्रमाण कायम राहते. नॉन व्हेज एवढं प्रोटीन तुम्हाला त्यातून मिळेल. म्हणूनच लोक अनेकदा ते त्यांच्या आहारात समाविष्ट करतात. काही लोक चणे मोडनंतर खातात, काही ते उकडल्यानंतर आणि काही ते भाजून खातात. आता प्रश्न असा आहे की चणे खाण्याच्या कोणत्या पद्धतीमुळे सर्वात जास्त आरोग्य फायदे मिळतात. चला हे सविस्तरपणे पाहूया.
कोणत्या प्रकारचा चणा फायद्याचा?
एक्सपर्टनुसार तर सगळ्याच पद्धतीचे चणे तुम्हाला फायदेशीर ठरतात. पण मोड आलेल्या चण्यांबद्दल बोलायचं झाल्यास यामुळे पाचन छान राहते. यामुळे गॅसची समस्या कमी होते. कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी फायबर अत्यंत प्रभावी आहे. त्यात पोटॅशियमचे प्रमाणही चांगले असते, जे उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. मोड आलेल्या चण्यामध्ये सर्व प्रकारचे पोषक घटक जास्त असतात कारण ते गरम केले जात नाही.
उकडलेले चणे
उकडलेले चणे हे सुद्धा पचनक्रिया चांगले करण्याचे काम करते. ते पचायलाही सोपे असतात, परंतु उष्णतेमुळे त्यांचे पौष्टिक मूल्य मोड आलेल्या चण्यांपेक्षा कमी असते. उकडलेले चणे शरीराला ऊर्जा प्रदान करते आणि वजन कमी करण्यास देखील मदत करते. चणे खाल्ल्याने तुमची भूक कमी होण्यास मदत होते, ज्यामुळे तुम्हाला अतिरिक्त कॅलरीजचे सेवन टाळण्यास मदत होते. त्यात लोह देखील असते जे अशक्तपणा दूर करण्यास मदत करते.
भाजलेले चणे हे एक आरोग्यदायी, कमी फॅट्स, हाय प्रथिनेयुक्त नाश्ता आहे. ते खाण्याचे अनेक फायदे आहेत, ज्यात हृदयाचे आरोग्य वाढवणे देखील समाविष्ट आहे. मधुमेहींसाठी देखील हे फायदेशीर आहे कारण ते रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करते. पण, काही लोकांना ते खाल्ल्यानंतर पचनाच्या समस्या येऊ शकतात.







