Tuesday, August 25, 2026
Homeमहाराष्ट्रमोठी बातमी! नाशिकचे बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांचं अपहरण, रात्रीपासून पोलिसांकडून शोध...

मोठी बातमी! नाशिकचे बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांचं अपहरण, रात्रीपासून पोलिसांकडून शोध सुरू

मोठी बातमी! नाशिकचे बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांचं अपहरण, रात्रीपासून पोलिसांकडून शोध सुरू

[ad_1]

नाशिक : नाशिकमधून (Nashik) मोठी बातमी समोर येत असून प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि गजरा ग्रुपचे प्रमुख हेमंत पारख (Hemant Parakh) यांचे अपहरण झाल्याने खळबळ उडाली आहे. शहरातील इंदिरानगर भागात वास्तव्यास असलेल्या पारख यांचे राहत्या घरासमोरुन शनिवारी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास अपहरण (Kudnapping) करण्यात आल्याचे समोर आले आहे. पोलिसांकडून पारख यांचा शोध सुरू करण्यात आला असून या घटनेने कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून शहरात खळबळ उडाली आहे. 

एकीकडे नाशिक शहरातील गुन्हेगारी (Nashik Crime) नागरिकांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. तर दुसरीकडे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. अशातच नाशिकमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक असलेले हेमंत पारख यांचे अपहरण झाल्याची घटना काल रात्रीच्या सुमारास घडली. रात्रीच्या सुमारास पारख हे घराबाहेर असताना अचानक काही अज्ञात इसम पारख यांच्या घरासमोर आले. या संशयितांनी पारख यांना चारचाकीत घालून पळ काढला. काही संशयित चारचाकी तर काही दुचाकीवर आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दरम्यान, पारख यांचं अपहरण झाल्याचं कळताच पोलिसांनी (Nashik Police) घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे.

दरम्यान, एका प्रसिद्ध व्यावसायिकाला त्याच्या घरासमोरुन उचलण्यात आल्याने नाशिक शहरात खळबळ उडाली आहे. अपहरण झाल्याचे कळताच रहिवाशांनी पोलिसांना घटनेबाबत कळवले. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या वरिष्ठ पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळावर पोहचला. पोलिसांनी तत्काळ पाऊले उचलली असून परिसरातील सीसीटीव्ही तपासून अपहरणकर्त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके रवाना करण्यात आली आहेत. हेमंत पारख यांचे नेमक्या कोणत्या कारणासाठी अपहरण करण्यात आले, अपहरणकर्ते नेमके कोण आहेत, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. नाशिक पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला असून याप्रकरणी ग्रामीण पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पोलिसांकडून कसून तपास सुरू 

शनिवारी रात्री घडलेल्या घटनेनंतर पारख यांचं अपहरण झाल्याची बातमी नाशिकमध्ये वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे नाशिककर चांगलेच हादरून गेले आहेत. शहरात गुन्हेगारी एवढी वाढली की, संशयित घरासमोर येऊन अपहरण करत असल्याने नाशिककरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या घटनेने पारख कुटुंबालाही धक्का बसला आहे. रात्रीपासूनच पोलिसांकडून पारख यांचा शोध सुरु आहे, मात्र आज सकाळपर्यंत पारख यांचा शोध लागलेला नाही. परिसरातील सीसीटीव्हीही तपासून पाहण्याचं काम सुरू आहे. तसेच शहरात अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. तसेच, प्रत्येक वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. मात्र, रात्र उलटून गेली तरी पारख यांचा शोध न लागल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Nashik : मागील सहा वर्षांत 211 खून, यंदा ऑगस्टपर्यंत 27 जणांना संपवलं, नाशिकच्या भल्यासाठी हे थांबलं पाहिजे! 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments