मुलाला हौसेनं बोटीवर नेलं; मात्रं काळानं घात केला, बोट दुर्घटनेत संपूर्ण आहिरे कुटुंब संपलं

0
33
मुलाला हौसेनं बोटीवर नेलं; मात्रं काळानं घात केला, बोट दुर्घटनेत संपूर्ण आहिरे कुटुंब संपलं


Mumbai Boat Accident News Marathi : मुलाच्या उपचारासाठी अहीरे कुटुंबं मुंबईत आलं होतं. उपचार झल्यावर मोकळ्या वेळात मुलाची बोटीत बसण्याची हाऊस पूर्ण करण्यासाठी अहिरे दाम्पत्य मुलासह एलिफंटा येथे जाणाऱ्या बोटीत बसले. तर सासरे हे सामान सांभाळत हे किनाऱ्याजवळ थांबले. आपली मुलगी, नातू आणि जावई कधी येईल ? त्यांचा फिरण्याचा अनुभव कधी सांगतील या आशेने वाट पाहत थांबलेले गोविंद अहिरे यांचं काही क्षणात जग उजाडलं. नौदलाच्या बोटीने धडक देऊन झालेल्या अपघातात त्यांचा जावई, मुलगी आणि नातू या तिघांचा मृत्यू झाला. त्याचे मृतदेह पाहून त्यांनी टाहो फोडला.



Source link