Tuesday, September 8, 2026
Homeमहाराष्ट्र‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी’चे प्रमुख असलेल्या एकनाथ शिंदेंच्या विश्वासू सहकाऱ्याला डच्चू; कोण...

‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी’चे प्रमुख असलेल्या एकनाथ शिंदेंच्या विश्वासू सहकाऱ्याला डच्चू; कोण आहेत नवीन प्रमुख?

[ad_1]

राज्यातील गरजू, गोरगरीब जनतेला गंभीर आजारपणाच्या काळात तत्काळ आर्थिक मदतीसाठी राज्य शासनाच्या ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षा’कडून त्वरित आर्थिक मदत पुरवण्यात येते. अडीच वर्षापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे समर्थक, माजी पत्रकार असलेले मंगेश चिवटे यांची ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी’च्या प्रमुखपदी नियुक्ती केली होती. आता मात्र देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मंगेश चिवटे यांना डच्चू देण्यात आला असून रामेश्वर नाईक यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस गेले अडीच वर्ष राज्याचे उपमुख्यमंत्री असताना रामेश्वर नाईक हे त्यांच्या ‘उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षा’चे प्रमुख होते. मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव श्रीकर परदेशी यांनी रामेश्वर नाईक यांच्या नुकतेच नियुक्तीचे पत्र दिले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments