
माझ्या खेळापेक्षा इतर गोष्टींचीच जास्त चर्चा झाली
दिव्या देशमुखने सांगितले, की स्पर्धेतील आपल्या कामगिरी आणि खेळापेक्षा तेथील लोकांचे लक्ष माझ्या कपड्यांकडे, केसांकडे आणि मी कशी बोलते, त्या उच्चारांकडे अधिक होते. मला याविषयी बोलायचे होते, पण मी माझी टूर्नामेंट संपण्याची वाट पाहत होते. मला हे आधीच सांगितले गेले होते आणि मी स्वतः देखील अनुभवले की बुद्धिबळातील महिलांना प्रेक्षक कसे हलक्यात घेतात. हे पाहून मला खरोखरच वाईट वाटले.







