- Marathi News
- Opinion
- Divya Bharti Birthday Death Anniversaryi| Divya Marathi Rasik Article Rumi Jafari Column
रूमी जाफरी, बॉलीवूड चित्रपटांचे लेखक, दिग्दर्शक5 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
‘रंग’मधील ‘तुझे ना देखूं तो चैन मुझे आता नहीं है’ या गाण्याच्या एका दृश्यात दिव्या भारती आणि कमल सदाना.
माझ्या हिश्श्याच्या किश्श्यंामध्ये आज मी दिव्या भारतीबद्दल सांगणार आहे. दिव्या हे जग सोडून गेली तेव्हापासून अनेक लोक माझ्या मागे लागलेत की, मी तिच्याविषयी काही लिहावं, बोलावं. पण, मी व्यक्त झालो नाही. ती गेली त्यालाही आता खूप काळ उलटला आहे. एप्रिलमध्ये दिव्याला जाऊन ३१ वर्षे होतील. अलीकडेच तिचा जन्मदिवसही झाला. त्यामुळं काही दिवसांपासून तिची आठवण येते आहे. ती असती तर आम्ही यंदा तिचा ४९ वा वाढदिवस साजरा केला असता.
मला अजूनही चांगलं आठवतंय की, २५ फेब्रुवारी या तिच्या वाढदिवशीच मला राहुल रवैल, शाहरुख खान आणि माधुरी दीक्षित यांचा ‘अंजाम’ हा सर्वात मोठा चित्रपट मिळाला होता. आज जो किस्सा मी सांगणार आहे, तो तेव्हाचा आहे, जेव्हा ती डी. एन. नगरमधील माझ्या घरी राहत होती. रॉकेलच्या स्टोव्हवर माझा नोकर राजू स्वयंपाक करायचा. एक दिवस दिव्याच्या शूटिंगला सुटी होती. ती आम्हाला म्हणाली, ‘आज मी स्वयंपाक करणार.’ मी आणि साजिदने तिला मनाई केली. पण, तिने ऐकले नाही. खूप मेहनत घेऊन तिने स्वयंपाक केला आणि पहिल्यांदाच आम्हाला खूप छान पद्धतीने जेवायलाही वाढले. एका प्लेटमध्ये सलाद दिले, पदार्थांवर कोथिंबीर भुरभुरली, टिश्यू व्यवस्थित पद्धतीने ठेवलेले. तथापि, तिला पोळ्या येत नसल्यामुळे राजूने त्या बनवल्या होत्या. तर मी, उदय आणि साजिद जेवायला बसलो. जसा पहिला घास तोंडात घातला तसं आम्ही एकमेकांकडं पाहिलं, हसलो आणि “व्वा!’ असं म्हणून जेवायला लागलो.
दिव्याने विचारलं, “कसं झालंय?’ आम्ही तिघांनीही, जेवण खूप छान झालंय म्हणत कौतुक केलं आणि पुन्हा खायला लागलो. मग ती जरा नाराजीनेच म्हणाली, ‘तुम्ही सगळे खाताय आणि मला खाण्याबद्दल विचारतही नाहीत.’ आम्ही म्हणालो, “हे सगळं आम्हीच खाणार. तुझ्यासाठी बाहेरून मागवू.’ तरी तिने ऐकलं नाही आणि जबरदस्तीने एक पोळी घेतली आणि तुकडा मोडून एक घास घेतला. घास चावताना एकदम तिने डोळे मोठे केले आणि एकाएकी बाथरूमकडे धावली. तिथे जाऊन तिने गुळणी केली. आणि परत येऊन आम्हाला म्हणाली, ‘इतकं मीठ! मला उलटी झाली, तुम्ही हे कसं खाताय?’ साजिद म्हणाला, ‘तू बनवलंयस. मग चांगलं झालं नाही म्हणून न खाण्याची आमची काय हिंमत? मी म्हणालो, “आम्ही जेवणातली चव नाही, तुझं त्यातलं प्रेम पाहात होतो.’
आणखी एक प्रसंग असा – दिव्याकडे 118 NE कार होती. त्यावेळी ही कार नवीनच लाँच झाली होती आणि दिव्याने ती खरेदी केली होती. एकदा मला ड्राइव्हवर घेऊन गेली. आम्ही परत आलो. पाठीमागून ड्रायव्हर ही कार घेऊन आला. दिव्या मला म्हणाली, ‘आजपासून तुम्ही रिक्षात फिरायचे नाही, आता ही कार तुमची.’ मी म्हणालो, ‘कोणीही आपल्या छोट्या बहिणीकडून भेट घेत नाहीत. मीही घेणार नाही.’ पण, तिने हट्टच धरला, मीदेखील आपल्या तत्त्वावर अडून बसलो.
दुसऱ्या दिवशी सकाळी ती शूटिंगला निघून गेली. तिचा बॉय माझ्याकडं आला आणि म्हणाला, ‘साहेब, लवकर चला. बघा, रस्त्यावर काय तमाशा सुरू आहे.’ मी गेलो आणि पाहतो तर काय, दिव्या रस्त्यावरून पायी चालते आहे अन् कार नि स्टाफ मागे-मागे चालतो आहे. ते तिला बसण्याची विनंती करताहेत, पण ती बसत नाहीय. मी दिव्याला थांबवलं आणि विचारलं, ‘दिव्या, हा काय तमाशा लावलाय?’ ती म्हणाली, “तुम्ही त्या कारमध्ये बसणार नाहीत तोपर्यंत मीसुद्धा कारमध्ये बसणार नाही. पायीच जाईन. आणि तुम्हाला माहीत आहे, मी किती हट्टी आहे.’ मी म्हणालो, “बरं, चल मी वचन देतो की, जिथे पार्किंग असेल अशा जेव्हा नवीन घरात शिफ्ट होईन, तेव्हा तुझ्याकडून कार घेईन.’ मी मोठ्या मुश्किलीने तिला समजावले आणि कारमध्ये बसवून शूटिंगच्या ठिकाणी पाठवले. यावरून मिर्झा गालिब यांचा एक शेर आठवतोय…
बस की दुशवार है
हर काम का आसां होना,
आदमी को भी
मयस्सर नहीं इंसां होना।
दिव्यासारखे लोक यापूर्वी केवळ कथा-कहाण्यांतच वाचले होते. वास्तव जीवनातही असे लोक असतात, हे फक्त दिव्यानेच सिद्ध केले होते. दिव्याच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस, जेव्हा जेव्हा भेटलो, ते सारं संस्मरणीय आहे. भविष्यात या सगळ्या गोष्टी आपल्या चरित्रात लिहीन. कारण दिव्याशिवाय माझे चरित्र पूर्णच होऊ शकत नाही. दिव्याचे हे दोन किस्से मी “रंग’ या माझ्या चित्रपटात घेतले होते आणि दिव्यावरच चित्रित केले होते. आज तिच्या आठवणीत ‘रंग’मधील हे गाणं ऐका…
तुझे ना देखूँ तो चैन
मुझे आता नहीं है,
एक तेरे सिवा कोई और
मुझे भाता नहीं है।
स्वत:ची काळजी घ्या, आनंदी राहा.







