माझ्या बायकोला धडा शिकवा! बंगळुरू, दिल्लीनंतर आता गुजरातमध्ये अतुल सुभाष सारखं प्रकरण; व्हिडिओ बनवून केली आत्महत्या

0
24
माझ्या बायकोला धडा शिकवा! बंगळुरू, दिल्लीनंतर आता गुजरातमध्ये अतुल सुभाष सारखं प्रकरण; व्हिडिओ बनवून केली आत्महत्या


Gujarat Suicide News : पत्नी आणि सासरच्या त्रासाला कंटाळून बंगरुळू येथे अतुल सुभाष याने आत्महत्या केली होती. हे प्रकरण ताजे असतांना दिल्ली येथे देखील एका व्यावसायिक तरुणाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. यानंतर आता आणखी एक घटना समोर आली आहे.  गुजरातमध्ये  एका पत्नी पीडित व्यक्तीने व्हिडिओ बनवून त्याचं जिवन संपवलं आहे.  या व्हिडिओमध्ये त्याने त्याच्या आत्महत्येसाठी त्याच्या पत्नीला जबाबदार धरले आहे.  या व्हिडिओत पत्नीला धडा शिकवण्यास त्याने कुटुंबीयांना सांगितलं आहे.  या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  



Source link