
Lokesh Murder Case Bengaluru : बंगळुरु दक्षिण जिल्ह्यातील एम.के. दोड्डी गावातील माजी पंचायत अध्यक्ष लोकेश यांच्या मृत्यूमागील रहस्य उलगडलं आहे. कर्जबारीपणामुळे आत्महत्या केल्याचा बनाव बनावण्यात आला होता. प्रथमदर्शनी पोलिसांनाही तेच वाटलं होतं. पण सखोल चौकशीनंतर एक महिन्यानंतर पोलिसांनी या हत्येचा उलगडा केला आहे. लोकेश यांनी आत्महत्या केली नव्हती तर त्यांची हत्याचा झाल्याच समोर आलं आहे. धक्कादायक म्हणजे त्यांच्या हत्येचा कट घरातील सदस्यानेच रचला होता. (bengaluru former panchayat president murder wife lover four hired killers Crime News in marathi)
आत्महत्येचा बनाव
लोकेश यांचा मृतदेह 23 जून 2025 ला कनवा धरणाजवळ त्यांच्या कारशेजारी आढळून आला होता. त्यानंतर पोलिसांनी सुरुवातीला घटनास्थळाची पाहणी केल्यावर अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली होती. पण दुसऱ्या दिवशी मकाळी गावातील पंचायत सदस्या आणि लोकेश यांची पत्नी चंद्रलेखा या मीडियासमोर आल्यात. त्यांनी अश्रू ढाळत पतीला कर्जबारीपणामुळे नैराश्य आलं होतं. या नैराश्यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचा दावा केला.
माजी पंचायत अध्यक्ष लोकेशची हत्येचा उलगडा कसा झाला?
पोलिसांना तपास असं दिसून आलं की, मृतदेहाजवळ विषाच्या बाटलीला झाकण नव्हतं. त्याशिवाय लोकेशच्या फक्त एका पायात चप्पल होती. यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पण दुसरीकडे पोस्टमार्टममध्ये शरीरात विष असल्याचं निष्पन्न झालं. त्यात असंही अंदाज लावण्यात आलं की ते जबरदस्तीने दिलं गेलं असावं.
पण पोलिसांचा हा संशय अजून बळावला तो त्या सीसीटीव्ही फूटजे हाती लागल्यावर. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक काळी कार लोकेश यांच्या पाठलाग करताना दिसून आली. पुढे तपासात योगेश नावाच्या तरुणाचे मोबाईल टॉवर लोकेशन मिळाले. त्यामुळे पोलिसांचा संशयाला अधिक बळ मिळालं. पोलिसांनी योगेशची माहिती गोळा करायला सुरुवात केली. त्यानंतर एक एक धक्कादायक खुलासा झाला.
दुसरीकडे लोकेशचे वडील मोटेगौडा यांनी चंद्रकला यांच्या हत्येमागे असल्याचा आरोप करत पोलीस तक्रार दाखल केली तेव्हा परिस्थिती नाट्यमय वळण घेत गेली. मोटेगौडा यांनी पोलिसांना सांगितलं की, त्यांची सून बंगळुरूमध्ये राहत होती तर त्यांचा मुलगा आठवड्यातून एक-दोनदा तिला भेटायला येत असे. त्यांनी असेही सांगितलं की या जोडप्यामध्ये सर्व काही ठीक नव्हतं. चंद्रकलाचे मंड्या येथील नवीले गावातील रहिवासी योगिशसोबत प्रेमसंबंध होते आणि लोकेशला ते कळलं होतं.
लोकेशची हत्या कोणी केली?
मोटेगौडा यांच्या म्हणण्यानुसार, दोड्डाबल्लापुरा जवळील कन्ना होसाहल्ली येथे एक जागा विकल्यानंतर चंद्रकला यांनी तिच्या पतीशी भांडण केले होते आणि त्यांना कायदेशीर नोटीसही पाठवली होती. दुसरीकडे योगेशला अटक करण्यात आली. चौकशी केल्यानंतर योगेश पोलिसांसमोर सगळं सत्य सांगितलं. योगेशने पोलिसांना सांगितलं की, चंद्रलेखाच्या सांगण्यावरून त्याने गुन्हेगारी टोळीला सुपारी दिली होती. आरोपी शिवलिंगा, सूर्या आणि चंदन यांनी 23 जून रोजी लोकेशचा पाठलाग करून, कनवा धरणाजवळ जबरदस्तीने त्याला विष दिलं. त्यानंतर आत्महत्या केल्याचा बनाव करून कार रस्त्याच्या कडेला उभी केली. लोकेशची हत्या त्याची पत्नी आणि प्रियकर यांनी केली होती. पोलिसांनी चंद्रलेखा, तिचा प्रियकर योगेश आणि सुपारी घेणाऱ्या तिन्ही आरोपींना गजाआड केलं आहे.