
BJP MLA Pramod Kumars dog Remark: काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या रेणुका चौधरी संसदेत आपल्या पाळीव कुत्र्याला सोबत घेऊन गेल्या होत्या. याच मुद्द्यावर बिहारचे भाजप आमदार तथा माजी मंत्री प्रमोद कुमार यांनी अत्यंत अश्लील आणि स्त्रीद्वेष्टे विधान केले. ज्यावरुन महिला वर्गातून त्यांच्यावर टीका केली जातेय. देशभरातून यावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काय आहे नेमकं प्रकरण? सविस्तर जाणून घेऊया.
काय नेमकं प्रकरण?
बिहारचे भाजप आमदार तथा माजी मंत्री प्रमोद कुमार यांनी एका युट्यूबरला मुलाखत दिली. ते म्हणाले, ‘अनेक महिलांना स्वतःच्या समाधानासाठी कुत्र्यांसोबत झोपण्याची सवय असते. मोबाईलवर व्हिडिओ पाहिले तर अशा अनेक क्लिप दिसतील’,असे ते म्हणाले. रेणुका चौधरी कुत्रा सोबत घेऊन गेल्या कारण तो त्यांचा ‘केंद्रबिंदू’ आहे, असेही ते पुढे म्हणाले. हे विधान सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली.
आरजेडीचा जोरदार हल्ला
राजदच्या महिला नेत्यांनी हा व्हिडिओ शेअर करत भाजपवर हल्लाबोल केला. त्यांनी लिहिले, “मोदींचे लाडके आमदार म्हणतात की, महिला आपले समाधान कुत्र्यांसोबत करतात. भाजपचे नेते-प्रवक्ते यांच्याशी सहमत आहेत का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आपल्या आश्रयदात्यांना महिलांबद्दल अश्लील बोलताना पाहून मोदींना आनंद होतो का? असे म्हणत त्यांनी पंतप्रधान मोदींनाही या वादात खेचण्याचा प्रयत्न केला. या टीकेमुळे भाजपची मोठी अडचण झालेली दिसून येते.
महिला आयोगाकडून तात्काळ दखल
‘बिहार राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा अप्सरा मिश्रा यांनी स्वतःहून या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. ‘हे विधान अत्यंत निंदनीय आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत आमदार प्रमोद कुमार यांना बोलावून खुलासा मागवला जाईल. दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल’, असे आयोगाने म्हटले आहे.आमदाराच्या पक्षांतर्गत सहकाऱ्यांनीही त्यांचे हे विधान फेटाळले आहे. असे असले तरी पक्षाकडून अधिकृत खंडन अद्याप आलेले नाही. त्यामुळे भाजपचा अशा विचारसरणीला पाठिंबाच, असा अर्थ विरोधक लावत आहेत.
पहिलीच वेळ नाही
रेणुका चौधरींवर वैयक्तिक हल्ला करताना भाजप नेत्याने केलेले वादग्रस्त विधान ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही अनेक भाजप नेत्यांनी महिला विरोधी, अश्लील आणि जातीयवादी वक्तव्ये केल्याचे विरोधक सांगतात. आता बिहार महिला आयोग काय कारवाई करणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. जनतेचा रोष ओढावल्यामुळे प्रमोद कुमार यांची आमदारकी धोक्यात आल्याचीदेखील चर्चा आहे.
FAQ
१. प्रश्न: भाजप आमदार प्रमोद कुमार यांनी रेणुका चौधरी यांच्याबाबत नेमके काय आक्षेपार्ह विधान केले?
उत्तर: त्यांनी एका युट्यूबरला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “अनेक महिलांना स्वतःच्या समाधानासाठी (म्हणजे लैंगिक समाधानासाठी) कुत्र्यांसोबत झोपण्याची सवय असते. मोबाईलवर व्हिडिओ पाहिले तर असे दिसते. रेणुका चौधरी संसदेत कुत्रा घेऊन गेल्या कारण तो त्यांचा केंद्रबिंदू आहे.” हे विधान अत्यंत अश्लील आणि स्त्रीद्वेष्ट्या स्वरूपाचे आहे.
२. प्रश्न: या विधानानंतर कोणी आणि काय कारवाई केली?
उत्तर: बिहार राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा अप्सरा मिश्रा यांनी स्वतःहून दखल घेऊन आमदार प्रमोद कुमार यांना नोटीस बजावली आहे. आयोगाकडे तक्रारी आल्यानंतर चौकशी सुरू झाली असून, दोषी आढळल्यास कठोर कारवाई होणार आहे. राजदनेही हा व्हिडिओ व्हायरल करून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
३. प्रश्न: राजदने या प्रकरणात मोदी आणि भाजपला कसे जोडले?
उत्तर: राजदच्या महिला नेत्यांनी सोशल मीडियावर लिहिले की, “मोदींचे लाडके आमदार असे घृणास्पद विधान करतात. भाजपचे नेते-प्रवक्ते यांच्याशी सहमत आहेत का? आपल्या आश्रयदात्यांना महिलांबद्दल अश्लील बोलताना पाहून मोदींना समाधान मिळते का?” यामुळे प्रकरण थेट पंतप्रधानांपर्यंत खेचले गेले आणि भाजपची मोठी अडचण निर्माण झाली.






