अभिनेता सयाजी शिंदे, उषा नाडकर्णी, उपेंद्र लिमये यांच्या भूमिका असलेल्या ‘ग्लोबल आडगाव’ मध्ये शेती, माती, ग्रामसंस्कृती बरोबरच जागतिकीकरणाच्या विळख्यात अडकलेला शेतकरी, जागतिकीकरणाचा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतीवर नेमका झालेला परिणाम अशा विषयावर भाष्य करण्यात आलेले आहे. भावनिक आणि संवेदनशील विषयाला या सिनेमाच्या माध्यमातून स्पर्श करण्यात आला असून या चित्रपटात ग्रामीण संवाद तसेच म्हणींचा सुरेख वापर करण्यात आला आहे. गायक आदर्श शिंदे , डॉ. गणेश चंदनशिवे आणि जसराज जोशी यांनी गायलेली कथेला पुढे घेऊन जाणारी अनेक गाणी चित्रपटात आहेत. अस्सल ग्रामीण बाज आणि विनोद या चित्रपटातून पहायला मिळणार असल्याचं दिग्दर्शकाने सांगितलं. या सिनेमाला पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवडण्यात आला होता.