
Sun Light For Diabetic Persons Health: आजकाल सर्वजण आरोग्याच्या बाबतीत जागरुक झाले आहेत. आरोग्याची योग्यरित्या काळजी घेत असतात. पण बदलती जीवनशैली आणि धावपळीमुळे खाण्या-पिण्याच्या वेळांकडे आणि पद्धतीकडे दुर्लक्ष होते. यामुळे कितीही काळजी घेतली तरी आरोग्याच्या कोणत्या न कोणत्या समस्या उद्भवत असतात. चुकीच्या आहारामुळे मुख्यतः मधुमेह होण्याची शक्यता अधिक असते. मधुमेह झाला की, आयुष्यभर औषधे घ्यावी लागतात, पथ्ये पाळावी लागतात. पण तुम्हाला माहित आहे का की, मधुमेहाच्या रुग्णांसाठी दिवसाचा प्रकाश किती फायदेशीर आहे? त्यांच्यासाठी दिवसाचा आजार संजीवनी प्रमाणे कार्य करतो.
टाइप-2 मधुमेहाचा धोका टाळता येतो
दिवसाच्या नैसर्गिक प्रकाशाचे मधुमेहाच्या रुग्णांना अनेक फायदे होतात. प्रकाशात मुख्यतः व्हिटॅमिन डी मोठ्या प्रमाणात असतो. ज्यामुळे शरीराच्या पूर्ण आरोग्य तर सुरळीत राहतेच, रक्तातील साखरेचे प्रमाण देखील नियंत्रणात राहते. शरीरात व्हिटॅमिन डीचे प्रमाण कमी झाल्यास स्वादुपिंडाला शरीरात इन्सुलिन निर्माण करण्यास अडथळे निर्माण होऊ शकतात. ज्यामुळे टाइप-2 मधुमेहाचा धोका वाढू शकतो. सूर्यप्रकाश घेतल्याने शरीरातील इन्सुलिन संवेदनशीलता वाढण्यास मदत होते. ज्यामुळे शरीराच्या कार्यात रक्तातील साखरेचा वापर अधिक चांगल्या प्रकारे होतो आणि साखर नियंत्रणात राहते. म्हणूनच दररोज कमीत कमी 10 ते 15 मिनिटे कोवळ्या उन्हात बसणे किंवा चालणे फायदेशीर ठरते.
इन्सुलिन निर्माण होण्यास मदत होते
नैसर्गिक सूर्यप्रकाशामुळे शरीरातील ‘मेलाटोनिन’ आणि ‘सेरोटोनिन’ या हार्मोनचे संतुलन राहते. यामुळे शारीरिक आणि मानसिक ताण कमी होतो. ज्यामुळे शरीरातील ऊर्जा टिकून राहते. तसेच पचनसंस्था सुधारल्यामुळे वजन नियंत्रणात ठेवणे सोपे होते. वजन नियंत्रणात राहिल्यास मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासही मदत होते. कारण, वजन जास्त असल्यास अतिरिक्त चरबीमुळे शरीरात इन्सुलिन तयार करण्यास अडथळे येतात. ज्यामुळे रक्तातील साखर अचानक वाढण्याची शक्यता असते.
रोगप्रतिकारशक्ती वाढते
योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश घेतल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये जखमा भरून येण्यास वेळ लागतो. किंवा कोणताही संसर्ग लवकर होतो. आजार बरा होण्यासही वेळ लागतो. म्हणूनच मधुमेहाच्या रुग्णांना सूर्यप्रकाशाची अत्याधिक आवश्यकता असते. पण फक्त मधुमेहाच्या रुग्णांनीच नाही तर समान्य व्यक्तींनीही आवर्जून सकाळी किंवा दुपारी सूर्यप्रकाश घ्यायला हवा. मुख्यतः लहान मुलांनी सूर्यप्रकाश घेणे अधिक महत्त्वाचे आहे. वाढत्या वयात शरीराच्या विकासासाठी अधिक फायदेशीर ठरते.
(Disclaimer: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)








