
Manipur Violence : मणिपूरमधून पुन्हा हिंसाचार उफाळला आहे. हिंसाचाऱ्याच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये शनिवारी तिघांचा मृत्यू झाला. यातील दोन जण बिहारमधील मजूर होते. दरम्यान, पोलिसांनी चकमकीत एका दहशतवाद्यालाही कंठस्नान घातले आहे. काकचिंग जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी दोन मजुरांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सुनेलाल कुमार (वय १८) आणि दशरथ कुमार (वय १७) अशी हत्या करण्यात आलेल्या मजुरांची नावे आहेत. हे दोघेही बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यातील राजवाही गावचे रहिवासी आहेत.