Satyajit Patankar on Shambhuraj Desai: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर पाटणमधील नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी कराड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केले. भाजप पक्षप्रवेशावरून शंभूराज देसाई गटाकडून होणाऱ्या टीकेला सत्यजित पाटणकरांनी उत्तर दिलं आहे. आम्ही छत्रपतींच्या उपस्थितीत भाजपत पक्षप्रवेश केला. तुम्ही पक्षाशी गद्दारी करून गुवाहाटी सुरतला पळून जाण्याच काय कारण होतं? असा सवाल शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांना विचारला. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सत्यजित पाटणकर यांनी शंभूराज देसाई व शिंदे गटावर तोफ डागल्याने पाटणला महायुतीत जुंपणार असल्याचे चित्र दिसत आहे.
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत बोलणार
दरम्यान, शंभूराज देसाई आणि सत्यजितसिंह पाटणकर यांच्यात राजकीय वाद सुरुवातीपासून आहे. विधानसभा निवडणुकीत पाटणकरांनी अपक्ष विधानसभा निवडणूक लढवली होती. सत्यजीत पाटणकर यांन भाजप प्रवेश करताच शंभूराज देसाई नाराज असल्याची चर्चा आहे. पाटणचे आमदार आणि पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी आम्ही बोलणं योग्य नाही, आम्ही आमचं काम करत आहोत. गेल्या अडीच वर्षात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आणि आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत. या दरम्यान महायुती म्हणून सगळीकडे काम केलं आहे. मंत्री म्हणून ज्या ज्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या त्या पूर्ण केल्या आहेत. आमच्या विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटातील नेत्यांचा प्रवेश झाला आहे. मी याच्याबाबत जे काय बोलायचं आहे ते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत बोलणार आहे. भेटीची वेळ मागितलेली आहे, असं शंभूराज देसाई म्हणाले.
सत्यजित पाटणकर यांचे भाजपा परिवारात हार्दिक स्वागत!
‘विकसित भारत’ घडविण्याचे क्षमता व सामर्थ्य केवळ भारतीय जनता पार्टीमध्येच आहे, ही बाब राज्याच्या कानाकोपऱ्यातील राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांना पटवून देण्यात यश येत आहे. याचाच एक भाग म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.)… pic.twitter.com/lz6lJO41q4
— Ravindra Chavan (@RaviDadaChavan) June 10, 2025
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा