भाजपकडून आणखी एक ठाकरे चोरण्याचा प्रयत्न; उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका, ‘महाराष्ट्रात मोदी नव्हे, तर…’

0
14
भाजपकडून आणखी एक ठाकरे चोरण्याचा प्रयत्न; उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका, ‘महाराष्ट्रात मोदी नव्हे, तर…’


नांदेडमध्ये आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी समर्थकांना फक्त जल्लोषात राहू नका, तर प्रयत्न करा असा कानमंत्रही दिला. उद्धव ठाकरे म्हणाले की, सध्या बोगस बियाण्यांचा सुळसुळाट झाला आहे. भाजपातच अस्सल बियाणं नाही, तर ते शेतकऱ्यांना काय देणार. यांचं सगळं बियाणं बोगस आहे. ते सर्व माणसं बाहेरुन घेत आहेत.आजही कोणालातरी घेतलंय. कारण, त्यांना माहितीय, महाराष्ट्रात मतं मिळवायची असतील तर मोदीचा करिष्मा चालत नाही. येथे आजही ते ठाकरे नावावरच मिळतात. म्हणून बाळासाहेबांचा फोटो चोरला, आज आणखी एक ठाकरे चोरायचा प्रयत्न करत आहेत. अशा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी भाजपावर केला आहे.



Source link