ब्रेस्ट मिल्क काढण्यासाठी पंपिंग करणे योग्य की अयोग्य? यामुळे बाळाच्या स्तनपानावर काय परिणाम होतो?

0
12
ब्रेस्ट मिल्क काढण्यासाठी पंपिंग करणे योग्य की अयोग्य? यामुळे बाळाच्या स्तनपानावर काय परिणाम होतो?


प्रसुतीनंतर काही आठवड्यांनी जेव्हा आई पुन्हा कामावर रुजु होण्याचा किंवा बाळाला काही काळासाठी घरी ठेऊन बाहेर जाण्याचा विचार करते तेव्हा तिच्यासमोर सगळ्यात मोठा प्रश्न हा उभा राहतो की बाळाचे स्तनपान कसे सुरु राहिल? यावर पर्याय म्हणजे  ब्रेस्ट पंपचा वापर. हे वापरल्याने स्तनातील संपूर्ण दूध काढून घेता येतं, जेणेकरून जास्त दूध तयार देखील होतं. 

Add Zee News as a Preferred Source

बाळाला यशस्वीपणे जन्म दिल्याबद्दल अभिनंदन. नवीन मात्र ब्रेस्ट पंपिंगबद्दलच्या अनेक गैरसमजांमुळे महिलांमध्ये अनावश्यक भीती निर्माण करतात.या गैरसमजुती कोणत्या आणि त्यामागची वास्तविकता काय आहे हे या लेखाच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आले आहे.

गैरसमज: पंपिंग म्हणजे बाळ व्यवस्थित स्तनपान करू शकत नाही

वास्तविकता: थेट स्तनपान किंवा ब्रेस्ट पंपने काढलेले दूध पिणे दोन्ही परिस्थितीत बाळाला समान पोषण मिळते. पंपिंगमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासही मदत होते. त्यामुळे गोंधळून जाऊ नका किंवा घाबरू जाऊ नका. काम, आरोग्याच्या समस्या किंवा बाळाशी संबंधित आव्हानांमुळे थेट स्तनपान शक्य नसतानाही, पंपिंगमुळे मातांना स्तनपान सुरू ठेवता येते.

गैरसमज: पंपिंग केल्याने दुधाची पोषकता कमी होते. बाळाला आवश्यक पोषक तत्व मिळत नाहीत

वास्तविकता: पंप केलेले स्तनपान हे थेट स्तनपानाइतकेत पोषक असते. अशावेळी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. पंप केलेल्या दुधातही त्याच अँटीबॉडीज, प्रथिने, चरबी आणि जीवनसत्त्व असतात. दुधाची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी योग्यरित्या साठवणे आणि स्वच्छता महत्त्वाची आहे, परंतु पंपिंगमुळे स्वतःहून स्तनपानाचे पोषणमुल्य कमी होत नाही. तुम्ही बाळासाठी सुरक्षितपणे दूध पंप करू शकता.

गैरसमज: ब्रेस्ट पंप वापरणे वेदनादायक आणि हानिकारक आहे; त्यामुळे ब्रेस्ट पंप टाळणेच योग्य

वास्तविकता: अनेक महिला ब्रेस्ट पंपिंगचा पर्याय निवडतात आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारची अस्वस्थता किंवा वेदना होत नाही. योग्य आकाराचा पंप,  सक्शन आणि योग्य तंत्रज्ञानाचा वापर केल्यास कोणतीही अडचण येत नाही. आधुनिक ब्रेस्ट पंप कोणत्याही समस्येशिवाय बाळाच्या नैसर्गिक स्तनपानाच्या पद्धतीप्रमाणेच प्रभावी ठरते. त्यामुळे ताण घेऊ नका आणि तज्ञांनी सांगितल्यानुसार ब्रेस्ट पंपचा वापर करा.

गैरसमज: ब्रेस्ट पंपमुळे दुधाच्या पुरवठ्यावर परिणाम होतो आणि दुध उत्पादन कमी होते, ज्यामुळे बाळ भुकेले आणि अशक्त राहते

वास्तविकता: उलट, नियमित पंपिंगमुळे शरीराला अधिक दूध तयार करण्याचा संकेत मिळतो. पंपिंग सत्र चुकवणे, चुकीच्या आकाराचे फ्लेंज वापरणे किंवा पंपिंगचे अयोग्य तंत्र यामुळे दुधाच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. जेव्हा बाळाच्या आरोग्याचा प्रश्न येतो, तेव्हा तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. जर तज्ञांनी तुम्हाला ब्रेस्ट पंप वापरण्याचा सल्ला दिला असेल, तर योग्य प्रकारे पंप कसा वापरावा हे त्यांच्याकडून समजून घ्या.





Source link