फलटण : तथागत भगवान गौतम बुद्ध यांची २५८६ वी जयंती शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. बुद्ध जयंती महोत्सव कमिटी आणि साहस क्रीडा मंडळाच्या वतीने शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी आकर्षक सजावट, देखावे, आतिषबाजी बघण्यासाठी शहरातील लोकांनी एकच गर्दी केली होती.
बुद्ध जयंतीच्या निमित्ताने महोत्सव कमिटी आणि साहस क्रीडा मंडळाच्या वतीने विविध उपक्रम घेण्यात आले होते. यामध्ये नगर परिषदेतील कामगारांना मसाला दूध वाटप. शहरातील विविध हॉस्पिटल मधील रुग्णांना फळे वाटप तसेच कालकथित प्रेमा वसंत काकडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ दहावीच्या विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करण्यात आली.
जयंतीच्या मध्यरात्री डॉ. बाबासाहेब आंबडेकर चौक येथे हजारो उपासक उपासिका यांनी सामूहिक त्रिशरण पंचशील घेऊन भगवान बुद्धांना अभिवादन आणि वंदन करण्यात आले. यानिमित्ताने चौकात बुद्धांची मूर्ती असलेली भव्य देखावा आणि आकर्षक सजावट करण्यात आली होती.
या मिरवणुकीमध्ये छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षानिमित्त, शाहू महाराज तसेच महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबडेकर आणि भगवान बुद्धांची प्रतिमा असलेल्या सहा ट्रॉली आकर्षक सजावट करून तयार करण्यात आल्या होत्या. शहरातील मंगळवार पेठ येथून या मिरवणुकीची सुरवात करून विविध भागातून हि मिरवणूक काढण्यात आली.
मिरवणुकीचा प्रारंभ तुषार मोहिते (आयकर सह आयुक्त मुंबई (भारत सरकार ), ऋषिकेश अहिवळे (विक्रीकर सहाय्यकआयुक्त पुणे), नेहा मोहिते (उपअभियंता जलसंपदा विभाग), मंजुषा भोसले (आरटीओ इन्स्पेक्टर), अमितकुमार अहिवळे (सहाय्यक कक्ष अधिकारी गृह विभाग मंत्रालय), आयु निलेश धेंडे (सहाय्य कक्ष अधिकारी नियोजन विभाग ) यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी फलटण नगर परिषदेचे नगरसेवक सनी अहिवळे, सचिन अहिवळे, वैशाली अहिवळे तसेच जयंती महोत्सव कमिटी, साहस क्रीडा मंडळाचे कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रातील इतर मान्यवर उपस्थित होते.