
रितेश देशमुखची ग्रँड एण्ट्री
रितेश भाऊच्या शानदार एण्ट्रीचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रितेश देशमुख हे नाव ऐकले नाही असे महाराष्ट्रात एकही गाव नाही. त्यामुळेच तर प्रोमोमध्ये रितेश भाऊ म्हणतोय, “धरल्याबगर सोडलं नाय तर रितेश विलासराव देशमुख आपलं नाव नाही.” एकंदरीत काय तर नव्या पर्वाची शानदार सुरुवात झाली असून सबका भाईच्या ग्रँड अंदाजाचं सर्वत्र कौतुक होणारचे. सगळचं कसं ‘लय भारी’ आहे.