
Bihar Murder News : बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका महिलेवर बलात्कार करण्यात अपयशी ठरलेल्या डॉक्टरने चाकूने तिचे पोट फाडले. ज्यामुळे महिलेचे आतडे बाहेर आले. तिला तातडीने पूर्णिया येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र, तिचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी केननगर येथील काझा कालव्याजवळ घडली. शुक्रवारी कुटुंबीय पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता ही घटना उघकडीस आली आहे. मरंगा पोलीस ठाण्यातील बडी बैठाणा येथील रहिवासी शेखर झा असे आरोपीचे डॉक्टरचे नाव आहे.




