- Marathi News
- Opinion
- Barkha Dutt’s Column, What Is The Secret Behind The Huge Success Of The Film “Dhurandhar”?
1 दिवसापूर्वी
- कॉपी लिंक
भारतीय बॉक्स ऑफिसवर ८०० कोटी आणिजगभरात १,२०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करणारा//”धुरंधर’ हा एक इतिहास घडवणारा चित्रपट बनलाआहे. पाकिस्तानचा दहशतवाद्यांना असलेला आश्रय तोउघड करतो. तिथेही चित्रपटाला प्रेम मिळाले.पाकिस्तानी लग्ने आणि पार्ट्यांमध्ये लोक त्याच्यासंगीतावर नाचत आहेत. कराचीच्या लियारी भागातटोळीयुद्धे दाखवली जातात. त्याच्या प्रचंड यशामागीलरहस्य हे केवळ चित्रपट निर्माते आणि समीक्षकांनीचनव्हे तर आपण प्रेक्षकांनीही समजून घेतले पाहिजे.
फोन आणि लॅपटॉपवर नेटफ्लिक्स पाहण्याच्या या युगातहा चित्रपट खरोखरच मोठ्या पडद्यावर सिनेमॅटिकअनुभव देतो असे म्हणता येईल. उत्कृष्ट स्टारकास्ट,अॅक्शन आणि डान्स सीक्वेन्स, सेट डिझाइन आणि निर्मितीपासून ते संगीत- कथाकथनापर्यंत – सर्व काही मोठ्या पडद्यासाठी तयार केले गेले आहे.
७० आणि ८० च्या दशकात वाढलेल्या आपल्यापैकीअनेकांच्या कल्पनाशक्तीला चित्रपटांनी आकार दिलाआहे. दशकांनंतर “धुरंधर’ बद्दलही असेच घडत आहे.चित्रपटाने एकात्मता निर्माण करण्यात यश मिळवलेआहे. हा उत्तम प्रकारे बनवलेला चित्रपट पाहिल्यानंतरअनेक लोकांनी बलुचिस्तान, रहमान डकैत आणिबेनझीर भुट्टो यांच्या पीपीपीचा इतिहास गुगलवर शोधलाआहे. कदाचित माहितीपट, बातमी किंवा पुस्तकवाचल्यानंतर एवढे झाले नसते.
चित्रपटाचा आणखी एक असामान्य पैलू म्हणजेजवळपास संपूर्णपणे पाकिस्तानवर आधारित हाकदाचित पहिला भारतीय चित्रपट आहे. पाकिस्तानीबाजारपेठ, निवडणूक रॅली, खरे पोलिस आणिराजकारण्यांपासून प्रेरित असंख्य काल्पनिक पात्रे -सर्वकाही अत्यंत काळजीपूर्वक रचले गेले आहे.भारतात दहशतवादी हल्ल्यांचा कट रचण्यातआयएसआयची भूमिका निर्भयपणे उघडकीसआणताना ते पाकिस्तानमधील दैनंदिन जीवनाचे अचूकचित्रण देखील करते.
काही समीक्षकांनी असा आरोप केला आहे की हाचित्रपट भारतीय मुस्लिमांविरुद्ध प्रचार आहे. पण ही एकहास्यास्पद टीका आहे. चित्रपटात आपल्याचलोकांविरुद्ध संशय निर्माण करतो असा एकही क्षण दिसतनाही. निश्चितच भारतीय मुस्लिमांना पाकिस्तानीलोकांशी तुलना करतात तेच त्यांचे सर्वात मोठे नुकसानकरत आहेत. भारतीय मुस्लिमांकडे कधीही अशादृष्टिकोनातून पाहू नये. असे करणारे लोक समुदायाचाअपमान करतात. मी दोन मुस्लिम मित्रांसोबत हा चित्रपटपाहिला आणि त्यांनाही तो माझ्याइतकाच आवडला.
आदित्य धर यांच्या चित्रपट निर्मितीची आणखी एकपद्धत विचार करायला लावणारी आहे. ती म्हणजेकाल्पनिक दृश्ये आणि वास्तविक जीवनातील फुटेजचीसांगड. एक प्रेक्षक म्हणून या चित्रपटात खूप भावनिकदृश्ये होती. उदाहरणार्थ- २६/११ च्या मुंबई दहशतवादीहल्ल्याच्या नियोजनाची काल्पनिक दृश्ये एका मोठ्यापडद्यावर हल्ल्याच्या प्रत्यक्ष प्रतिमांशी जोडली गेलीआहेत.
मी स्वतः त्या दृश्यावरून हल्ल्याचे वृत्तांकन केले. हीयुक्ती कथाकथन तंत्र म्हणून अत्यंत प्रभावी ठरते. किंवारहमान डकेतचे पात्र घ्या. त्याला मुंबई हल्ल्यातील एकप्रमुख दुवा म्हणून चित्रित केले आहे. चित्रपटात तोआयएसआय आणि पाकिस्तानी सैन्यासोबत कटरचताना दाखवला आहे. परंतु प्रत्यक्षात त्याचे नावहल्ल्यावरील भारताच्या स्वतःच्या कागदपत्रांमध्येहीदिसत नाही. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की चित्रपटहे माहितीपट नसतात.
आणि शेवटी चित्रपटाचे संगीत हा एक मजबूत घटकआहे. तो कव्वाली आणि काही जुन्या सुरांनापुनरुज्जीवित करतो. बहरीनी शैलीत गायलेले एकअरबी गाणे आजकाल एक लोकप्रिय ट्रेंड बनले आहे.चित्रपटातील संगीत हे पात्रांइतकेच महत्त्वाचे आहे.चित्रपट पाहिल्यानंतरही तेच आठवणीत राहते. पूर्वीच्या पिढ्यांसाठी ‘शोले” होता तशीच आजच्यापिढीसाठी ‘धुरंधर” ही एक -कल्ट फिल्म आहे. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे)
भारतीय मुस्लिमांकडे पाकिस्तानशीजोडून बघणारे लोक स्वत: च आपलेनुकसान करत आहेत. मी हा चित्रपट दोनमुस्लिम मित्रांसोबत पाहिला आणित्यांनाही तो माझ्याइतकाच आवडला.







