बटाटा खाल्याने वजन वाढते, हे मिथक आहे की सत्य? तज्ज्ञांकडून जाणून घ्या नेमके उत्तर

0
10
बटाटा खाल्याने वजन वाढते, हे मिथक आहे की सत्य? तज्ज्ञांकडून जाणून घ्या नेमके उत्तर


Eating Potato Can Lead To Weight Gain: आजकाल सर्वजण  आरोग्य आणि वजनाच्या बाबतील अधिक जागरूक झाले आहेत. प्रत्येकाला एक चांगले आरोग्य आणि सिक्स पॅक अ‍ॅब्स हवे असतात. वजन कमी करण्यासाठी डाएटिंग सुरू करताना बरेचजण त्यांच्या आहारातून बटाटा पूर्णपणे वर्ज करतात. कारण त्यांच्या मते बटाटा खाल्याने वजन अधिक वाढते. काहीवेळेला आई सुद्धा म्हणते “जास्त बटाटा खाऊ नकोस, नाहीतर बटाट्यासारखी जाड होशील!”. तसेच मधुमेहाची समस्या असलेले व्यक्तीही बटाटा खाल्यास रक्तातील साखर वाढेल  या भीतीने बटाटा खाणे टाळतात. पण खरंच बटाटा खाल्याने वजन किंवा रक्ताताली साखर वाढते? असा प्रश्न तुम्हालाही कधी न कधी पडला असेल. चला तर मग तुमच्या या आणि यांसारख्या अनेक प्रश्नाचे नेमके उत्तर आरोग्य तज्ज्ञांकडून जाणून घेऊया. 

Add Zee News as a Preferred Source

 

बटाट्यामध्ये फक्त कॅलरीज असतात का? 

कोणत्याही भाजीत बटाटा वापरला तरी तो चविष्टच लागतो. ‘आज कोणती भाजी बनवायची?’ या प्रश्नाचा खोल विचार केला तरी, शेवटचा पर्याय म्हणून ताटात बटाट्याची भाजीच वाढली जाते. बऱ्याचदा असेल मानले जाते की, बटाट्यात कोणतेही पौष्टिक गुणधर्म नसतात. पण तज्ज्ञ सागंतात की, मोठ्या प्रमाणात कॅलरीज असतात. खरे तर, बटाट्यात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक फायबर असते आणि कॅलरीज कमी प्रमाणात असतात. बटाट्यात विटॅमिन सी, बी6 आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतात. म्हणजेच बटाट्यात फक्त कार्ब्स किंवा स्टार्च नाही तर, अनेक पौष्टिक घटकही असतात. 

 

बटाटा खाल्याने वजन वाढते का?

बटाटा खाल्याने वजन वाढते हे की नाही,  हे बटाट्याच्या शिजवण्याच्या पद्धतीवर अवलंबून आहे. बजारात बटाट्यापासून बनलेले अनेक पदार्थ उपलब्ध असतात. बटाटा वापरून फ्रेंच फ्राइज, कटलेट, बटाटा वडा असे अनेक तेलकट जंक फूड बनवले जातात. हे सर्व पदार्थ डिप फ्राय केले जातात. त्यामुळे त्यात कॅलरी आणि निरोगी फॅटचे प्रमाण वाढते. पण तोच बटाटा जर तुम्ही उकडवून, भाजून किंवा ग्रील करून खाल्ला तर, त्यातील कॅलरीजचे प्रमाण आहे तेवढेच राहते. म्हणूनच तज्ज्ञांच्या मते तुमचे वजन बटाटा खाल्याने नाही तर, चुकीच्या खाण्याच्या पद्धतीमुळे वाढते. 

 

मधुमेहाची समस्या असणाऱ्या व्यक्तींनी बटाटा खाणे टाळावे का?

बटाट्यात रक्तातील साखर वाढवणारे ग्लाइसेमिक इेंडेक्स असते. पण बटाटा उकडवल्याने त्यातील स्टार्चचे रूपांतर रेसिस्टेंट स्टार्चमध्ये होते. जे शरीरासाठी फायबर प्रमाणे काम करते.  ज्यामुळे रक्तातील साखर जलद गतीने वाढत नाही. तसेच प्रोटीन आणि फायबर असलेल्या भाज्यांसह बटाटा खाल्ला तर शुगर स्पाइक होण्याची  शक्यता कमी होते. जे मधुमेहाच्या रूग्णांसाठी फायदेशीर मानले जाते. 

 

बटाट्यामध्ये असलेले कार्ब्स आरोग्यासाठी फायदेशीर नसतात का?

बऱ्याचवेळा वजन कमी करण्यासाठी अनेकजण त्यांच्या आहारातून कार्ब्स पूर्णपणे वर्ज करतात. पण तज्ज्ञांच्या मते आहारातून कार्ब्स पूर्णपणे काढून टाकल्यास आरोग्यास धोकादायक ठरू शकते. असे केल्यास शरीराला पुरेशी ऊर्जा मिळणार नाही. ज्यामुळे अशक्तपणा, थकवा, चक्कर येणे, रोगप्रतिकारशक्ती कमी होणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. बटाट्यामध्ये असलेले कॉम्पलेक्स कार्ब्स आणि फायबर शरीराला ऊर्जा पुरवण्याचे कार्य करतात. लंडन आणि अमेरिकेतही लोक अनेकवेळा सकाळच्या नाश्त्यात उकडलेला बटाटा आणि ब्रेड खाणे पसंत करतात. 

 

(Disclaimer: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)





Source link