प्रेमात आणि युद्धात सर्व माफ; बलात्काराच्या आरोपीला मुक्त करताना न्यायालय असे का म्हणाले?

0
21
प्रेमात आणि युद्धात सर्व माफ; बलात्काराच्या आरोपीला मुक्त करताना न्यायालय असे का म्हणाले?


Court News: मद्रास उच्च न्यायालयाने बलात्काराच्या आरोपीला मुक्त करताना म्हटले की, प्रेमात आणि युद्धात कोणताही नियम नसतो. या प्रकरणात सुटका झालेला आरोपी २०१४ मधील एका बलात्कार प्रकरणात अटकेत होता. या प्रकरणातील पीडितेने एका मुलाला जन्म दिला होता. आरोपीने आपल्या शिक्षेच्या विरोधात २०१७ मध्ये न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. न्यायालयाने या मुलाच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर हे प्रकरण मध्यस्थीकडे पाठवले होते. या दरम्यान तक्रारदार महिलेने दुसऱ्या मुलाला जन्म दिला. जस्टिस एन शेषशायी यांनी निकाल देताना म्हटले की, हे प्रकरण खुपच अनोखे आहे. सिंगल बेंच न्यायाधीशांनी म्हटले की, दोघांमध्ये मध्यस्थीचा परीनाम असा झाला की, त्यांना दुसरा मुलगा झाला.



Source link