फलटण: कथित गैरवर्तनाचा बदला घेण्यासाठी खोटे इन्स्टाग्राम अकाउंट तयार करून एका तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढत त्याचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. फलटण तालुक्यातील गोखळी येथील नीरा नदीपात्रात मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी एकाच कुटुंबातील चौघांना (Phaltan Crime News) अटक केली आहे.अंकुश नरबट राहणार माण असे मृत तरुणाचे नाव आहे. संशयितांनी महिलेच्या नावाने बनावट सोशल मीडियावरून संपर्क साधत १५ फेब्रुवारी रोजी त्याला फलटण येथे बोलावले. तातमगिरी डोंगराच्या पायथ्याशी नेऊन मारहाण केल्यानंतर त्याचा खून करून मृतदेह नीरा नदीत फेकण्यात आला.सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावत अविष्कार भगत, श्रद्धा भगत, ज्ञानेश्वर भगत आणि अर्चना भगत यांना अटक केली आहे.(Phaltan Crime News)
अंकुश बापू नरबट (वय २२, रा. ढाकणी, ता. माण, जि. सातारा), असे खून झालेल्या तरुणाचे तर आविष्कार ज्ञानेश्वर भगत, श्रद्धा आविष्कार भगत, ज्ञानेश्वर भरतराव भगत, अर्चना ज्ञानेश्वर भगत (चौघे रा. पिंप्रद, ता. फलटण, जि. सातारा), अशी पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. अंकुश नरबटच्या डोक्यावरील जखमांमुळे पोलिसांना संशय आला. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.(Phaltan Crime News)
तपासात निष्पन्न झाले की, कथित गैरवर्तनाचा बदला घेण्यासाठी खोटे इन्स्टाग्राम अकाउंट तयार करून एका तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढत त्याचा खून करण्यात आला. बदला घेण्याच्या उद्देशाने त्यांनी खुनाचा कट रचला. महिलेच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम खाते उघडून अंकुशला प्रेमाच्या जाळ्यात ओढले व त्याला फलटण येथे बोलावण्यात आले. १५ फेब्रुवारी रोजी अंकुश फलटण येथे आल्यानंतर संबंधित महिलेने त्याला एकांतात वेळ घालवण्याच्या बहाण्याने तातमगिरी डोंगराच्या पायथ्याशी नेले. त्याठिकाणी कटानुसार इतर चार आरोपी वेगवेगळ्या वाहनांतून आले. त्यांनी अंकुशला मारहाण करून वाहनात टाकले व पिंप्रद येथील निर्जनस्थळी नेले. तेथे त्याचा खून करून मृतदेह गोखळी हद्दीतील नीरा नदीत फेकून दिला.
पुरावे तपासल्यानंतर गुन्हा उघडकीस आला, हा खून अत्यंत थंड डोक्याने व नियोजनबद्ध पद्धतीने केल्यामुळे सुरुवातीला पोलिसांकडे कोणतेही ठोस धागेदोरे नव्हते. मात्र, पोलिसांनी फलटण ते दहिवडी मार्गावरील हॉटेल्स, दूध डेअरी व पेट्रोल पंप येथील सीसीटीव्ही फुटेज तपासले. आरोपी व मृतक यांच्या मोबाइल 3 क्रमांकांची तांत्रिक माहिती मिळवून त्याआधारे पुराव्यांची साखळी जोडत गुन्हा उघडकीस आणला. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.
आणखी वाचा






