पुरुषांची प्रजनन क्षमता धोक्यात! अन्नातील ‘हे’ रसायन घालवतंय स्पर्म काउंट; संशोधनातून धक्कादायक खुलासा

0
7
पुरुषांची प्रजनन क्षमता धोक्यात! अन्नातील ‘हे’ रसायन घालवतंय स्पर्म काउंट; संशोधनातून धक्कादायक खुलासा


Male Fertility Decline: पुरुषांचा स्पर्म काउंट हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. अनेक पुरुषांना ही समस्या भेडसावते. ही समस्या सोडवण्यासाठी ते ऑनलाईन पोर्टल्सची मदत घेत असतात. पण नेहमीच्याच खाण्यातील काही पदार्थ स्पर्म काऊंटवर परिणाम करतात, हे बहुतांशजणांना माहिती नसतं. यासंदर्भातील एक नवीन अहवाल समोर आलाय. काय आहे या अहवालात? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Add Zee News as a Preferred Source

उंदरांवर प्रयोग

शेतीत वापरल्या जाणाऱ्या “निओनिकोटिनॉइड्स” नावाच्या कीटकनाशकांमुळे पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता वेगाने कमी होत असल्याचे नवीन अभ्यासातून समोर आले आहे. प्रयोगशाळेतील नर उंदरांवर केलेल्या चाचण्यांमध्ये या रसायनांमुळे स्पर्म काउंट, त्यांची हालचाल आणि रचना खराब झाल्याचे आढळले. मानवांवरही असाच परिणाम होण्याची शक्यता खूप जास्त असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

20 वर्षांच्या 21 अभ्यासांचे विश्लेषण

“एन्व्हायर्नमेंटल रिसर्च” जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या पुनरावलोकनात 2005 ते 2025 या कालावधीतील 21 प्रयोगांचा अभ्यास केला. यात निओनिकोटिनॉइड्सच्या संपर्कात आलेल्या प्राण्यांमध्ये वृषणांचे ऊतक (टेस्टिक्युलर टिश्यू) खराब झाले, हार्मोन्सचा तोल बिघडला आणि शुक्राणूंचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले, असे शास्त्रज्ञांना दिसून आले.

अन्नातून थेट शरीरात प्रवेश

ही कीटकनाशके झाडाच्या मुळापासून पानापर्यंत पूर्णपणे शोषली जातात. त्यामुळे फळे-भाज्या कितीही धुतल्या तरी त्यांचे अवशेष राहतात. 50 टक्क्यांहून अधिक लोकांच्या शरीरात आणि मुलांमध्ये तर आणखी जास्त प्रमाणात या रसायनांचे कण सापडले, असे अमेरिकेतील सर्वेक्षणात असे आढळले. म्हणजे आपण रोज जे खातो त्यातून हे विषारी पदार्थ आपल्या शरीरात जातात, असा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी काढला.

शरीरावर नेमके काय परिणाम होतात?  

ऑक्सिडेटिव्ह तणाव वाढून शुक्राणूंच्या पेशी आणि त्यांचे डीएनए खराब होते   पुरुष हार्मोन्सचे सिग्नलिंग बिघडते आणि वृषणांचे ऊतक नष्ट होतात, असा निष्कर्ष संशोधनातून निघाला. परिणामी स्पर्म काउंट आणि त्यांची गतिशीलता कमी होते,प्रजनन क्षमता घटते, असे यात पुढे म्हटले आहे. 

तज्ज्ञांचा इशारा

“हे संशोधन फक्त प्राण्यांपुरते मर्यादित नाही. सर्व सस्तन प्राण्यांमध्ये शुक्राणू बनण्याची प्रक्रिया सारखीच असल्याने मानवांवरही हा धोका आहे,अन्नातील कीटकनाशकांचे अवशेष हळूहळू पुरुषांची प्रजनन शक्ती कमी करत आहेत’, असे  असे प्रमुख संशोधिका सुमैया इरफान आणि वेरोनिका सांचेझ यांनी सांगितले. त्यामुळे आता कीटकनाशकांचा वापर कमी करणे आणि सेंद्रिय शेतीकडे वळणे यांची गरज अधोरेखित झाली आहे. 

FAQ

प्रश्न: पुरुषांमध्ये स्पर्म काउंट कमी होण्यामागे आता कोणते नवीन कारण समोर आले आहे?

उत्तर: शेतीत वापरल्या जाणाऱ्या “निओनिकोटिनॉइड्स” नावाच्या कीटकनाशकांमुळे शुक्राणूंची संख्या, गुणवत्ता आणि गतिशीलता कमी होत असल्याचे नवीन संशोधनात सिद्ध झाले आहे. ही रसायने अन्नातून शरीरात जातात

प्रश्न: फळे-भाज्या धुतल्या तरी ही कीटकनाशके निघत नाहीत का?

उत्तर: नाही. ही निओनिकोटिनॉइड्स झाडाच्या आत पूर्णपणे शोषली जातात, त्यामुळे फळे-भाज्या पाण्याने धुतल्यावरही त्यांचे अवशेष राहतात आणि ते आपल्या रोजच्या आहारातून शरीरात प्रवेश करतात.

प्रश्न: हे संशोधन फक्त प्राण्यांवरच आहे की मानवांनाही धोका आहे?

उत्तर: हे संशोधन प्राण्यांवर केले असले तरी सर्व सस्तन प्राण्यांमध्ये (माणूसही) शुक्राणू बनण्याची प्रक्रिया सारखीच असते. अमेरिकेत अर्ध्या लोकांच्या शरीरात आणि मुलांमध्ये तर जास्त प्रमाणात ही रसायने आढळली आहेत. म्हणून मानवांवरही प्रजनन क्षमतेवर गंभीर परिणाम होण्याचा धोका आहे.





Source link