Pataal Lok 2: सध्या अनेक वेब सीरिज या चर्चेत असल्याचे पाहायला मिळते. त्यामध्ये ‘पाताल लोक’ या सीरिजचा देखील समावेश आहे. पहिला सिझन गाजल्यानंतर आता या सीरिजचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगण्यात आले होते. तसेच या सीरिजची आतुरतेने वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. या सीरिजच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. तसेच या नव्या सिझनमध्ये काय पाहायला मिळणार याविषयी देखील माहिती देण्यात आली आहे.