
पद्मिनी कोल्हापुरे आणि सचिन खेडेकर स्टारर ‘चिमणी पाखरं’ हा चित्रपट नक्कीच तुम्हाला आठवत असेल. २००१ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंतीची पावती मिळाली होती. पद्मिनी कोल्हापुरे आणि सचिन खेडेकर यांच्यासह बाळ धुरी, विजय चव्हाण, लक्ष्मीकांत बेर्डे, तुषार दळवी या सारख्या कलाकारांनी चित्रपटात महत्वाच्या भूमिका बजावल्या होत्या. या कलाकारांसोबत चार बालकलाकार चित्रपटात झळकले होते. भारती चाटे, अविनाश चाटे, मेघना चाटे आणि निहार शेंबेकर. या बालकलाकारांनी आपल्या अभिनयाने प्रेकक्षकांची मने जिंकली होती. या मुलांपैकी भारती चाटे हिने चित्रपटात थोरल्या मुलीची भूमिका वठवली होती. मात्र सुंदर अभिनय करूनसुद्धा भारती पुढे कुठे दिसली नाही.