एक खूप गहन बाब आहे की, पूजेच्या बाबतीत अत्युच्च समर्पण भावसमजू शकतो. परंतु कर्मकांडाच्या आहारी जाऊन त्या गोष्टीचावेडेपणा निश्चितच चुकीचा होय.आपल्या संतांनी हीच बाब उत्तमरीत्यासमजून घेतली होती. भक्तिकाळात एक मोठे काम झाले. त्या काळीप्रचलित धर्म अनेक कारणांमुळे निष्प्राण होत होता. भरकटत होता. यासंतांनी त्यात प्राण फुंकले. सध्या शिक्षण तंत्रज्ञानाला कलेचाही थोडाआधार घ्यायला हवा, अन्यथा ते पूर्णपणे कोरडे होईल. धर्माच्याबाबतीतही हेच घडत आहे. काही लोक धर्माला राजकारणाच्याआश्रयाला घेऊन जात आहेत, तर काही निव्वळ कर्मकांडांकडे. खरंतर धर्माला योगाशी जोडावे लागेल. यंत्रयुगात हे अत्यंत गरजेचे आहे.विशाल धार्मिक परंपरा अशा ठिकाणी उभी राहिली आहे. जिथे धर्म,अर्थ, काम आणि मोक्ष असे मार्ग आहेत. ध्येय निश्चित केल्यानंतरचमार्गावरून चालावे.
Source link







