- Marathi News
- Opinion
- Pt. Vijayshankar Mehta’s Column, Evaluate Your Relationships With Children On A Daily Basis
1 दिवसापूर्वी
- कॉपी लिंक
आपली मुले हळूहळू अशा जगात जगत आहेत जिथे त्यांनीआपल्यासारखे जगले पाहिजे – हा आग्रह करू नये. काहीही असो.ते चांगला माणूस म्हणून जगले पाहिजेत. आपल्या मुलांशी जोडलेलेरहा. भले मग एखादा तंतू किंवा धागा का असेना. तुमच्याकडेकाहीही असो, जोडलेले रहा. आपण आपले विचार आणि भावनावहीमध्ये लिहितो तेव्हा त्याला जर्नलिंग किंवा रोजनिशी म्हणतात.
मुलांसोबतच्या नात्यातही असाच सराव करावा. त्यांचे वर्तन,स्वभावातील बदल व तुम्ही काय करू शकता ते लिहा. आपणत्यांच्या वह्या, गुणपत्रिका पाहतो. इतर गोष्टींचेही मूल्यांकन करतो.परंतु नात्याचा आढावा जर्नलिंगसारखा करावा. मुलाने या महिन्यातकाय केले – नकारात्मक असो किंवा सकारात्मक – याकडे बारकाईनेलक्ष द्या आणि ते लिहून ठेवा. आणि त्यांच्या वर्तनाबद्दल मांडलेलेमुद्दे पालकत्वात नियोजनबद्ध पद्धतीने समाविष्ट करा. तुम्हाला चांगलेपरिणाम मिळतील.






