
राहुल गांधीजालौर येथीलप्रचारसभेत बोलत असताना गर्दीतून लोक पनौती पनौती असं ओरडू लागले होते. त्यानंतर राहुल गांधी हसत म्हणाले की, “आपल्या खेळाडूंनी विश्वचषक जिंकला असता मात्र पनवती आले आणि हरवलं. हे टीव्हीवाले सांगणार नाहीत, पण जनतेला माहिती आहे. राहुल गांधींनी यावेळी नरेंद्र मोदींचं नाव घेणं टाळलं होतं. पण नंतर त्यांनी दुसऱ्या एका सभेत पंतप्रधान म्हणजे ‘पनवती मोदी’ असं म्हटल्यानं वाद निर्माण झाला होता.







