
गीर (पूर्व) चे उप वन संरक्षक (DCF) राजदीपसिंह जाला यांनी सांगितले की, शुक्रवार रात्री किंवा शनिवारी सकाळी दोन सिंहिणी एका नीलगायीचा पाठलाग करताना उघड्या विहिरीत कोसळल्या. शेतकऱ्यांनी सकाळी साडे सात वाजता वनविभागाला याची सूचना दिली. जाला यांनी सांगितले की, विहिरीजवळ दोन सिंहिणी आणि एका नीलगायीच्या पायाचे ठसे दिसत आहेत. यामुळे अंदाज वर्तवला जात आहे की, दोन सिंहिणी नीलगायीची शिकार करण्याच्या प्रयत्नात विहिरीत कोसळल्या. मात्र नीलगाय या हल्ल्यात वाचली आहे.







