निवडणुकीच्या धामधुमीत रणवीर सिंह नरेंद्र मोदींविरोधात बोलला? ‘त्या’ Viral Video मागचं सत्य काय? वाचा

0
26
निवडणुकीच्या धामधुमीत रणवीर सिंह नरेंद्र मोदींविरोधात बोलला? ‘त्या’ Viral Video मागचं सत्य काय? वाचा


काय म्हणालाय रणवीर सिंह?

या आधीदेखील बॉलिवूडपासून ते साऊथ स्टार्सपर्यंत अनेक कलाकार आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) डीपफेक तंत्रज्ञानाचे बळी ठरले आहेत. त्याच वेळी, आता रणवीर सिंह याचा देखील एक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रणवीर सिंह पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोध करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये रणवीर सिंह म्हणताना दिसतोय की, ‘मोदीजींचे एकच उद्दिष्ट आहे, ते म्हणजे आमची बेरोजगारी, महागाई, आमचे दुःखी जीवन आणि वेदना यांचा जल्लोष साजरा करणे आहे. कारण भारतवर्ष आता अन्याय काळाकडे वाटचाल करत आहे, इतक्या वेगाने वाटचाल करत आहे की, आपला विकास आपला न्याय मागायला विसरता कामा नये. त्यामुळे विचार करूनच मतदान करा.’ या व्हिडीओच्या शेवटी काँग्रेसला मत द्या अशी टॅगलाईन दिसत आहे. यावरूनच लक्षात येते की, हा एक फेक व्हिडीओ आहे, ज्यामध्ये रणवीरच्या व्हिडीओचा वापर करून त्याचा आवाज बदलण्यात आला आहे.



Source link