
काळजी घ्यायला हवी होती!
यावरचा उपाय सुचवताना सोनाली म्हणाली की, ‘बॉलिवूडमध्येही असे उदाहरण पाहायलं मिळालं आहे. अभिनेत्री कियारा अडवाणी हीचं नाव आलिया होतं. मात्र, मनोरंजन विश्वात आल्यावर तिने आपलं नाव कियारा करून घेतलं. कारण, आलिया नावाची अभिनेत्री आधीच बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहे, हे तिला माहीत होतं. कियाराने तिच्यासारखं नाव आलेल्या दुसऱ्या अभिनेत्रीच्या अस्तित्वाची काळजी घेण्याचा प्रयत्न केला, तसा आपल्याकडेही व्हायला हवा होता. गुगल सर्च केल्यावर देखील वेगवेगळ्या सोनाली कुलकर्णी दिसतात, तेव्हा असं वाटतं की, आपण काही मोठं काम केलेलंच नाही का? आपली वेगळी ओळख नाही का? या प्रश्नांमुळे खूप त्रास होतो.’







